तामिळनाडूतील मंडपम येथे नवीन 2.05 किमी पंबन रेल्वे पुलाचे बांधकाम 2022 पर्यंत पूर्ण केले जाणार आहे, असे रेल्वे मंत्रालयाने रविवारी जाहीर केले. हा पूल रामेश्वरमला तामिळनाडूशी जोडेल. भारतातील हा पहिला उभा समुद्री पूल असणार आहे. सागरी पूल रेल्वे विकास महामंडळ(RVNL) 250 कोटी रुपये खर्च करुन हा पूल विकसित करणार आहे.
(हेही वाचाः अपघातात जखमी झालेल्यांना रुग्णालयात पोहोचवले, तर केंद्र सरकार देणार पैसे! अशी आहे योजना)
या प्रकल्पाची पायाभरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मार्च 2019 मध्ये कन्याकुमारी येथे केली होती. या पुलाच्या बांधकामामुळे भारतीय रेल्वे जलद गतीने धावू शकणार आहे. यामुळे पंबन आणि रामेश्वरम दरम्यान असलेली वाहतूक वाढेल. यात 18.3 मीटरचे 100 स्पॅन आणि 63 मीटरचे नेव्हिगेशनल स्पॅन असतील. रामेश्वरमला भारताच्या मुख्य भूमीशी जोडणारा सध्याचा पंबन रेल्वे पूल 105 वर्षे जुना आहे.
(हेही वाचाः भारत सरकारने बनवलेली सोन्याची नाणी कुठे मिळतात माहीत आहे का? वाचा)
पंबन रेल्वे पूल
मंडपमला मन्नारच्या आखातातील रामेश्वरम बेटाशी जोडण्यासाठी 1914 मध्ये पंबन रेल्वे पूल बांधण्यात आला. 1988 मध्ये सी लिंकवरुन नवीन पूल तयार होईपर्यंत दोन्ही ठिकाणांना जोडणारा हा एकमेव दुवा होता. 105 वर्षे जुना पूल यापुढे विकासाला गती देण्यासाठी पुरेसा नसल्याने रेल्वे मंत्रालयाने एक नवीन पूल बांधण्याचा निर्णय घेतला.
(हेही वाचाः शक्तीपीठं, साईबाबा मंदिर, सिद्धिविनायक व इतर देवस्थानांत कसा मिळणार प्रवेश? जाणून घ्या एका क्लिकवर)
दक्षिण रेल्वे रामेश्वरमपासून देशाच्या विविध भागांपर्यंत सेवा पुरवते. 2019 मध्ये पावसाळ्यातही याचे बांधकाम सुरू ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली होती, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. कामासाठी लागणारी सर्व उपकरणे जवळच असलेल्या पंबन येथे आणली गेली. या पुलामुळे शेरझर स्पॅन जहाजे स्वहस्ते चालवण्यास अनुमती मिळेल. प्रस्तावित सुविधेत इलेक्ट्रो-मेकॅनिकल नियंत्रित प्रणाली आणि रेल्वे नियंत्रण प्रणाली असणार आहे.
Join Our WhatsApp Community