दक्षिण भारतात ‘वंदे भारत’ आणि ‘भारत गौरव काशी दर्शन’ ट्रेनचा शुभारंभ! पहा क्षणचित्रे…

दक्षिण भारतातील पहिल्या आणि देशातील पाचव्या वंदे भारत रेल्वेचा शुभारंभ पंतप्रधान मोदींच्या हस्ते करण्यात आला आहे. शुक्रवारी पंतप्रधान मोदींनी KSR रेल्वे स्टेशनवरून या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला.

ही देशातील पाचवी आणि दक्षिण भारतातील पहिली वंदे भारत एक्स्प्रेस आहे. ही ट्रेन चेन्नई-बंगळुरू-मैसूर या मार्गावर चालवण्यात येईल. यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत गौरव काशी दर्शन ट्रेनला सुद्धा हिरवा झेंडा दाखवला आहे.

भारत गौरव योजनेअंतर्गत ही भारत गौरव काशी दर्शन ही ट्रेन चालवणारे कर्नाटक हे पहिले राज्य आहे. यामध्ये कर्नाटक यात्रेकरूंना काशी दर्शन घडवण्यासाठी कर्नाटक सरकार आणि रेल्वे मंत्रालय यांनी एकत्रित योजना आखली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी चार राज्यांच्या दौऱ्यावर आहेत

मोदींनी क्रांतिवीर संगोली रायण्णा म्हणजेच केएसआर रेल्वे स्टेशनवर मैसूर-चेन्नई वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवला.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here