लोणार सरोवराचा पर्यटनाच्यादृष्टीने विकास करण्यासाठी 369 कोटी 78 लाख रुपयांच्या विकास आराखड्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अलिकडेच मंजुरी दिली आहे.
यासंदर्भात उच्च न्यायालयाने आदेश दिले होते. या कामांची विभागीय आयुक्त, अमरावती यांच्या अध्यक्षतेखाली अंमलबजावणी केली जाईल. यामध्ये लोणार सरोवर परिसरात मंदिराचे जतन, निसर्ग पर्यटन, वन्यजीव संरक्षण, सरोवराभोवती पदपथ, रस्त्यांचे भूसंपादन, अतिक्रमण धारकांचे पुनर्वसन अशी विविध कामे केली जातील.
मध्यंतरी लोणार सरोवरात उन्हाळ्यात वाढलेल्या तापमानाने, सूर्यप्रकाशाने आणि अपुऱ्या पावसाळी पाण्याने बिटा कॅरोटीन रंगद्रव्य तयार होऊन सरोवरातील पाणी गुलाबी रंगाचे झाले होते.
नियोजन विभागाने मंजूर आराखड्यातील कामनिहाय आवश्यक निधी लोणार सरोवर विकास समितीकरीता पीएलए खाते तयार करुन त्यामध्ये वर्ग करण्यात येईल.
Join Our WhatsApp Community