1 of 11

1 प्रयागराज येथील कुंभमेळ्यात (Mahakumbh 2025) 13 जाने. रोजी प्रथम अमृतस्नान झाले. त्यानंतर कोट्यवधी भाविकांनी प्रयागराजला भेट देत अमृतस्नान केले आहे. महा कुंभमेळा प्रशासनाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत एकूण 52.83 कोटी भाविकांनी संगमात स्नान केले आहे.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी प्रयागराज येथे महाकुंभ त्रिवेणी संगमात पवित्र स्नान केले. त्यांनी संगमात पूजा-अर्चना-आरतीही केली. (Mahakumbh 2025)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी (५ फेब्रुवारी २०२५) महाकुंभमेळ्याला भेट दिली आणि त्रिवेणी संगमात पवित्र स्नान केले. (Mahakumbh 2025)

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी २७ जानेवारी रोजी त्रिवेणी संगमात पवित्र स्नान केले. यावेळी त्यांच्यासोबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही उपस्थित होते. (Mahakumbh 2025)

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 14 फेब्रुवारी 2025 रोजी पत्नी अमृता आणि मुलगी दिविजासोबत महाकुंभात स्नान केले. (Mahakumbh 2025)

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांच्या पत्नी आणि कुटुंबासह महाकुंभात स्नान केले. त्यांनी संगमात स्नान आणि पूजा केली. (Mahakumbh 2025)

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मंत्र्यांसह २२ जानेवारी २०२५ रोजी संगमात स्नान केले. मुख्यमंत्री योगी यांनी स्नान केल्यानंतर आरती आणि पूजा केली. (Mahakumbh 2025)

उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी सोमवारी 10 फेब्रुवारी 2025 रोजी त्यांच्या कुटुंबासह त्रिवेणी येथे पवित्र स्नान केले आणि आई गंगा, यमुना आणि सरस्वती यांना वंदन केले. (Mahakumbh 2025)

उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी २२ जानेवारी २०२५ रोजी महाकुंभ त्रिवेणी संगमात पवित्र स्नान केले. (Mahakumbh 2025)