विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या तैलचित्राचे अनावरण

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी फ्रान्सच्या मार्साय बंदरात घेतलेल्या ऐतिहासिक उडीला 8 जुलै रोजी 112 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या तैलचित्राचा अनावरण सोहळा संपन्न झाला. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या तैलचित्राचे अनावरण करण्यात आले.

यावेळी विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याला पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन केले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here