मुंबईपासून जवळ असल्यामुळे माथेरानला अनेक पर्यटक भेट देतात. पर्यटकांचे मुख्य आकर्षण असणारी नेरळ माथेरान मिनी ट्रेन शनिवार २२ ऑक्टोबरपासून सुरू झाली आहे. तब्बल ३ वर्षांनंतर माथेरानची राणी पुन्हा धावणार आहे. सकाळी ८.५० ला या मिनीट्रेनला हिरवा कंदिल दाखवण्यात आला.
ट्रेन पुन्हा सुरू झाल्याने प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
नेरळ ते माथेरान मिनी ट्रेन सेवा
1. 52103 नेरळ येथून 08.50 वाजता सुटेल आणि माथेरानमध्ये 11.30 वाजता पोहोचेल(दररोज)
2. 52105 नेरळ येखून दुपारी 2.20 वाजता सुटेल आणि माथेरानमध्ये 17.00 वा. पोहोचेल (दररोज)
माथेरान ते नेरळ मिनी ट्रेन सेवा
1. 52104 माथेरान येथून दुपारी 02.45 वाजता सुटेल आणि नेरळ येथे 17.30 वाजता पोहोचेल (दररोज)
2. 52106 माथेरान येथून 16.20 सुटेल आणि नेरळ येथे १९.०० वा पोहोचेल.(दररोज)