राज ठाकरेंच्या नातवाचे नाव ‘किआन’

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे आणि सून मिताली ठाकरे यांना काही दिवसांपूर्वी मुलगा झाला. राज ठाकरे आजोबा झाल्यानंतर त्यांच्या नातवाचे नाव काय असणार, याबाबत बरीच चर्चा सुरू होती. अखेर शुक्रवार, ६ मे रोजी नामकरण सोहळा पार पडला. त्यावेळी ‘किआन’ असे चिमुकल्याचे नाव ठेवण्यात आले. घरात नव्या पाहुण्याचे आगमन झाल्यानंतर ठाकरे कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. आमचं पूर्ण आयुष्य आता या चिमुकल्याभोवतीच फिरत आहे, असे राज ठाकरे आणि त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी आधीच स्पष्ट केले होते.

(हेही वाचा राज ठाकरेंच्या नातवाचे झाले नामकरण, बाळाचे नाव …)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here