मुंबई – बंगळुरू महामार्गावर विचित्र अपघात! ट्रकची ८ वाहनांना धडक

भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने चार रिक्षा, तीन कार, एक बोलेरो जीप अशा आठ वाहनांना जोरदार धडक देऊन चिरडले.

बंगळूर महामार्गावरील नवले पुलाजवळ शनिवारी, १० जुलै रोजी विचित्र अपघात झाला. या अपघातात आठ वाहनांचा अपघात झाला. यात आठही वाहनांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास पुणे-बंगळूर महामार्गावरुन भरधाव वेगात जाणाऱ्या ट्रकचालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. राष्ट्रीय महामार्गावर भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने चार रिक्षा, तीन कार, एक बोलेरो जीप अशा आठ वाहनांना जोरदार धडक देऊन चिरडले. या झालेल्या अपघातात सकाळी मॉर्निंग वॉकला आलेल्या ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला, तर तीन जण जखमी झाले आहेत. वडगाव बुद्रुक हायवे उड्डाण पुलाजवळील विश्वास हॉटेल समोर घडली. या अपघातात सर्व वाहनांचा अक्षरशः चुराडा झाला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here