कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शासनाने राज्यभरात संचारबंदी आणि कडक निर्बंध लावले आहेत. शासनाच्या आदेशाचे पालन व्हावे यासाठी पोलिस रणरणत्या उन्हात रस्त्यावर उतरले आहेत. या रणरणत्या उन्हात थोडासा दिलासा मिळावा, म्हणून पोलिसांना व्हॅनिटी व्हॅन पुरवण्यात आल्या आहेत. कुणाल सरमळकर यांच्या सौजन्याने विलेपार्ले एसीपी धर्माधिकारी, विलेपार्ले पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मांडवी, खेरवाडी एसीपी कैलाश आव्हाड व खेरवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक निकुंबरे या सर्वांना १-१ व्हॅनिटी व्हॅन सुपूर्द करण्यात आल्या आहेत. या व्हॅनचा पोलिसांना कपडे बदलणे, आराम करणे याकरता उपयोग करता येणार आहे. यामध्ये ३ रुम, शौचालय आणि वातानुकूलित यंत्रणाही आहे.
Join Our WhatsApp Communityपोलिसांना आता ‘गर्मी में भी थंडी का एहसास’!
या व्हॅनचा पोलिसांना कपडे बदलणे, आराम करणे याकरता उपयोग करता येणार आहे. यामध्ये ३ रुम, शौचालय आणि वातानुकूलित यंत्रणाही आहे.