राणीबागेतील ‘वीरा’ आणि ‘ऑस्कर’ची मुंबईकरांना भुरळ!

101

बंगाल वाघाची जोडी शक्ती (नर) व करिष्मा (मादी) यांनी १४ नोव्हेंबर २०२१ रोजी जन्म दिलेल्या मादी बछड्याचे नामकरण करण्यात आले असून तिचे नाव “वीरा” असे ठेवण्यात आले आहे. तर हम्बोल्ट पेंग्विन कक्षातील मोल्ट (नर) व फ्लिपर (मादी )यांच्या जोडीने १८ ऑगस्ट २०२१ रोजी जन्म दिलेल्या पेग्विन नर पिल्लाचे नामकरण करण्यात आले असून त्याचे नाव “आँस्कर ” असे ठेवण्यात आले आहे. या नामकरणाची घोषणा मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज दि. १८ जानेवारी २०२२ रोजी भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयातील केली.

Tiger 9
राणीबागेत जन्मली मुंबईकर वाघीण! ‘वीरा’ तिचे नाव…
Tiger 3
भायखळा येथील राणीबागेत अनेक वर्षानंतर वाघाने जन्म घेतला. उद्यानात दोन वर्षांपूर्वी दाखल झालेल्या करिश्मा आणि शक्ती या वाघांच्या जोडीला गेल्या वर्षी बालदिनाच्या दिवशीच बछडा झाला. उद्यानात पेंग्विनपाठोपाठ आता वाघांच्या जोडीनेही नव्या पिल्लाला जन्म दिला आहे. त्यामुळे प्राणिसंग्रहालयात आनंदाचे वातावरण आहे.
Tiger 2
नवे वाघ आणून उद्यानात प्राण्यांची संख्या वाढवण्याचा राणीबाग प्रशासनाचा उद्देश सफल झाला.
Tiger 6
राणीबागेतील शेवटचा वाघ २००६ साली तर शेवटचा सिंह २०१४ साली मृत्यू पावला. त्यामुळे उद्यानात वाघ, सिंहाची डरकाळी बंद झाली होती.
Tiger 5
‘वीरा’सहा महिन्यांची होईपर्यंत तिला पशुवैद्यकीय डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवले जाईल. सध्या तिला जंताची औषधे व लसीकरण करण्यात येत आहे.
Tiger 8
१२ फेब्रुवारी २०२० रोजी औरंगाबाद येथील सिद्धार्थ गार्डनर प्राणिसंग्रहालयातून करिश्मा आणि शक्ती या बंगाल वाघांची जोडी राणीबागेत आणली गेली. या जोडीच्या मिलनाने उद्यानाला नवी मुंबईकर वाघीण मिळाल्याने प्राणीप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
Tiger 4
मंगळवारी महापौर किशोरी पेडणेकर यांनी या मादी बछड्याला ‘वीरा’ असे नाव दिले आहे.
Oscar to the Mumbai Zoos
पेंग्विन कक्षातील मोल्ट आणि फ्लिपर या नर-मादी पेंग्विनच्या जोडीच्या मिलनातून जन्मलेल्या पेंग्विनच्या पिल्लाला ‘ऑस्कर’ असे नाव दिले.
Oscar to the Mumbai Zoos 1
या चार महिन्यांच्या पिल्लाच्या बारशासाचा मुहूर्त याआधी हिवाळी अधिवेशनामुळे फसला होता. राणीबागेत १८ ऑगस्ट रोजी जन्मलेल्या पेंग्विनच्या बारशाला अखेर मंगळवारचा मुहूर्त मिळाला.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.