कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी मुंबई पोलिसांचा फिल्मी अंदाज! अशी केली जनजागृती

रात्रंदिवस गुन्हेगारांपासून आपले रक्षण करण्यासाठी सदैव तत्पर आणि दक्ष असलेले पोलिस गेल्या वर्षभरापासून कोरोनाविरुद्ध लढा देण्यासाठी सुद्धा झटत आहेत. लोकांची गर्दी टाळण्यासाठी, नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी पोलिस कडक पहारा देत आहेत. पण त्याचप्रमाणे कोरोनापासून वाचण्यासाठी लोकांमध्ये जनजागृती करण्याच्या कामात सुद्धा पोलिस कुठेही मागे पडलेले नाहीत. यासाठी पोलिसांकडून सोशल मीडियाचा सुद्धा उत्तम प्रकारे वापर करण्यात येत आहे. मुंबई आणि महाराष्ट्र पोलिस आपल्या ट्विटर हॅंडलवरुन लोकांना कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करण्यासाठी सातत्त्याने आवाहन करत आहेत, त्यासाठी ते वेगवेगळ्या युक्ती लढवत आहेत. कोरोनापासून वाचण्यासाठी घरी राहणे, मास्क लावणे, सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमांचे पालन करणे, हे संदेश देण्यासाठी आता मुंबई पोलिसांकडून फिल्मी फंडा वापरण्यात आला आहे. बॉलिवूड स्टार्स तसेच काही सिनेमांमधील डायलॉगचा वापर मुंबई पोलिसांनी आपल्या ट्विटर हॅंडलद्वारे केला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here