अमेरिकेच्या ‘नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन’ (नासा) या अंतराळ शोध संस्थेने मंगळवारी 27 सप्टेंबर रोजी मोठा इतिहास रचला आहे. नासाने मंगळवारी पहाटे 4.45 वाजता पृथ्वीला लघु ग्रहांपासून वाचवण्याची यशस्वी चाचणी घेतली. या अभियानाला नासाने ‘डार्ट मिशन’ असे नाव दिले होते. आता जर भविष्यात पृथ्वीवर काही लघुग्रहांचा हल्ला होण्याची शक्यता निर्माण झाली तर या तंत्राने पृथ्वी वाचवता येणार आहे.
( हेही वाचा : सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाला बॅ. नाथ पै यांचे नाव देणार; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय)
लघुग्रहाची दिशा आणि वेग बदलण्याचा नासाचा प्रयोग यशस्वी झाला.
नासाला पृथ्वीच्या जवळ फिरणारे ८००० निअर अर्थ ऑब्जक्ट्स (NEO) आढळले आहेत. हे लघुग्रह पृथ्वीवर आदळल्यास पृथ्वीचा विनाश होऊ शकतो.
जे लघुग्रह पृथ्वीसाठी धोकादायक आहेत त्यांना नष्ट करण्यासाठी नासाकडून प्रयत्न केले जात आहेत.
नासा अंतराळ संस्थेने पृथ्वीला लघुग्रहांपासून वाचवण्यासाठी यशस्वी चाचणी घेतली आहे. या अंतर्गत त्यांचे डार्ट मिशन पार पाडले. लघुग्रहाची दिशा आणि वेग बदलण्याचा नासाचा प्रयोग यशस्वी झाला.
Join Our WhatsApp Community