नाशिकच्या चांबारलेनी पायथ्याशी दरवर्षीप्रमाणे पी रमनलाल यांच्या वतीने उन्हाळ्याच्या सुरुवातीला मडबाथचे आयोजन केले जाते, गेल्या अनेक वर्षांपासून ही परंपरा सुरू असून यामध्ये साधारण चारशे ते पाचशे लोक राजकीय पदाधिकारी, अधिकारी व उद्योगपती या ठिकाणी येऊन मडबाथचा आनंद घेतात, आज कोविडनंतर तब्बल दोन वर्षांनी या मडबाथचे आयोजन करण्यात आले. दरवर्षी ही माती गुजराथ येथून नर्मदानदीतून आणली जाते, त्यामध्ये विविध आयुर्वेदिक मिश्रण करून हे मडबाथ बनविले जाते, हे मडबाथ घेतल्याने उन्हाळ्यात आपल्या त्वचेला कुठलाही त्रास होत नाही, असे देखील म्हटले जाते.
(हेही वाचा राष्ट्रवादीचा छोटुसा भोंगा… मनसेचे ट्विट चर्चेत)
Join Our WhatsApp Community