1 of 7

नाशिकच्या (Nashik Satpir Dargah) काठे गल्लीत परिसरातील अनधिकृत दर्गा काढण्याचे काम पहाटेपासून सुरू करण्यात आले होते. या दर्ग्याच्या तोडकामाचे आतापर्यंत बहुतांश काम पूर्ण झाले आहे. (Nashik Satpir Dargah)

नाशिक पोलिसांनी 15 दिवसांपूर्वी सातपीर दर्ग्याचे बांधकाम हटवण्याची नोटीस दिली होती. मात्र, कालपर्यंत दर्ग्याचे बांधकाम हटवण्यात आले नाही. त्यामुळे पोलिसांनी आणि महानगरपालिकेने कारवाई केली. (Nashik Satpir Dargah)

मंगळवारी रात्री एका जमावाने दगडफेक केल्याने याठिकाणी तणावाची परिस्थिती निर्माण झाल्याचे पोलिसांनी सांगितले. दर्ग्याचे ट्र्स्टी आणि प्रतिष्ठित नागरिकांनी बांधकाम हटवण्याची तयारी दर्शविली होती. त्यानुसार मंगळवारी रात्री 11 वाजता हे सगळे जमले होते. त्याचवेळी उस्मानिया चौकाच्या बाजूने जमाव आला आणि गोंधळ सुरु झाला. दर्ग्याचे ट्रस्टी आणि प्रतिष्ठित नागरिकांनी जमावाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनीही जमावातील लोकांना समजावले. मात्र, त्यांनी कोणाचेही न ऐकता दगडफेक सुरु केली. (Nashik Satpir Dargah)

पोलिसांनी अश्रुधूर आणि सौम्य लाठीमार करत जमावाला पांगवले. याप्रकरणी आतापर्यंत 15 जणांना अटक करण्यात आली आहे. जमावाच्या दगडफेकीत 31 पोलिसांना किरकोळ दुखापत झाली आहे. जमावातील संशयित हल्लेखोरांच्या 57 बाईक्स पोलिसांच्या हाती लागल्या आहेत. (Nashik Satpir Dargah)

काठे गल्ली परिसरात अनधिकृत दर्गा हटविण्याची गेल्या अनेक वर्षाची मागणी होती. गेल्या महिन्यात हिंदुत्ववादी संघटनांच्यावतीने आंदोलन ही करण्यात आले होते. (Nashik Satpir Dargah)