अमेरिकेत हिमवादळामुळे लोक घराबाहेर पडणं टाळत आहे. शनिवारी आणि रविवारी अमेरिकेतील अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी झाली. अमेरिकेतील तापमान मोठ्या प्रमाणात घसरले असून प्रसिद्ध नायगारा धबधबा संपूर्ण गोठला आहे. नायगारा धबधब्याचे फोटो आणि व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
नायगारा धबधब्याचे रुपांतर बर्फाळ प्रदेशामध्ये झाले आहे. पाणी गोठल्यामुळे या संपूर्ण परिसरात फक्त बर्फ दिसत आहे. खरंतर, नायगारा या जगातील सर्वात मोठ्या धबधब्यांपैकी एक तसेच सर्वात धोकादायक धबधबा म्हणून ओळखला जातो. परंतु अमेरिकेतील हिमवादळाचा फटका आता नायगारा धबधब्यालाही बसला आहे.
द न्यूयॉर्क पोस्टच्या वृत्तानुसार या धबधब्याचा काही भाग गोठला आहे. हा धबधबा संपूर्णपणे गोठलेला नाही. काही भागातून पाणी वाहत आहे. नायगारा धबधब्यातून दर सेकंदाला ३१६० टन पाणी ३२ फूट उंचीवरून खाली पडते.
हा धबधबा कोट्यावधी पर्यटकांचे आकर्षण आहे. नायगारा धबधबा अमेरिकेतील नायगारा नदीवर आहे. बॉम्ब या हिमवादामुळे जनजीवपन विस्कळीत झाले आहे.
Join Our WhatsApp Community