पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांसह दिग्गजांनी केले भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन, पहा क्षणचित्रे

172

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अन्य मान्यवरांसह संसद भवन परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अपर्ण केली़. यावेळी  उपराष्ट्रपती  जगदीप धनकड, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री डॉ. विरेंद्र कुमार, प्रल्हाद जोशी, अर्जुन राम मेघवाल, रामदास आठवले, माजी केंद्रीय मंत्री मल्लिकार्जुन खर्गे आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.

New Project 12 1

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य मोठे आहे. त्यांच्याकडून जगण्याची प्रेरणा मिळते. तसेच संविधानामुळे सामान्य जनतेचं आयुष्य बदलले असे सांगत महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी चैत्यभूमीवरून जनतेला संबोधित केले.

New Project 14 1

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चैत्यभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले. यावेळी पक्षाचे विविध पदाधिकारी सुद्धा उपस्थित होते.

New Project 13 1

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे देशाला संविधान मिळाले. त्यांच्या मार्गावर चालण्याचा संकल्प करूया असे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

New Project 15 1

New Project 16 1
चैत्यभूमी दादर

महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमी, दादर येथे उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले आणि आदरांजली वाहिली. याप्रसंगी शिवसेना नेते, उपनेते, पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

New Project 19 1

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली वाहिली.

New Project 18 1

New Project 20 1
मुंबईतील विधानभवन येथे डॉ. नीलम गोऱ्हे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले.

विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुंबईतली दादरमधील चैत्यभूमीवर जाऊन महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आदरांजली वाहिली.

New Project 21 1

New Project 22 1
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले.

New Project 23 1

 

महापरिनिर्वाण दिनानिमित्त जामखेडमधील संविधान चौकात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून रोहित पवार यांनी अभिवादन केले.

New Project 24 1

महापरिनिर्वाण दिनानिमित्त कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी चैत्यभूमी, दादर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.