राजधानी दिल्लीमध्ये सेंट्र्ल व्हिस्टा प्रकल्पांतर्गत नव्या संसद भवनाचे बांधकाम सुरू आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अचानक या संसद भवनाचा दौरा केला. तसेच कामाची पाहणी केली. पंतप्रधान मोदी सुमारे तासभर नव्या संसदेच्या आवारात पाहणी करत होते. तेव्हा त्यांनी तेथील कामगारांशी संवाद साधला. कामगारांशी साधला संवाद साधला.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २०२० च्या डिसेंबर महिन्यात नव्या संसद भवनाची पायाभरणी केली होती. या संसद भवनामध्ये अत्याधुनिक सुविधा असतील. तसेच त्याचे बांधकाम हे टाटा प्रोजेक्टस लिमिटेडच्या माध्यमातून करण्यात येत आहे.
२०१९ मध्ये केंद्र सरकारने सेंट्रल व्हिस्टा पुनर्विकास प्रकल्प सुरू केला होता. त्यामध्ये अन्य कामांसह नव्या संसद भवनाच्या बांधणीच्या कामाचाही समावेश होता.
नव्याने बांधण्यात येत असलेल्या कॉम्प्लेक्सचा आकार त्रिकोणी आहे. तसेच नव्या संसद भवनाचे आयुर्मान हे १५० वर्षे असेल.
नव्या संसद भवनातील लोकसभेमध्ये ८८८ आणि राज्यसभेमध्ये ३८४ आसनांची व्यवस्था करण्यात आली आहे.
तसेच संयुक्त सत्रावेळी येथे १२७२ सदस्य बसू शकतात.
नव्या संसद भवनामध्ये मंत्र्यांची कार्यालये आणि समिती कक्षांसोबत एकूण ४ मजले असतील.