महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये रामगड नावाचा किल्ला अस्तित्वात असून याबाबत आपल्या सर्वांना माहिती आहे. परंतु आता दापोली आणि खेड या दोन तालुक्यांना जोडणाऱ्या सीमेवर पालगड गावाजवळ दुसरा रामगड किल्ला आढळला आहे. या किल्ल्याचा शोध दुर्ग अभ्यासक डॉ. संदीप परांजपे आणि डेक्कन कॉलेजचे पुरातत्व अभ्यासक सचिन जोशी यांनी लावला आहे. ऐतिहासिक संदर्भ आणि पुराव्यांनुसार हा किल्ला एवढे वर्ष अपरिचित होता असे अभ्यासकांचे मत आहे.
( हेही वाचा : धक्कादायक! पुण्यात जन्मदात्या आईनेच केली ४ वर्षांच्या मुलीची हत्या)
महाराष्ट्रात दोन रामगड
रत्नागिरी जिल्ह्यात दापोली आणि खेड या दोन तालुक्यांना जोडणाऱ्या सीमेवर पालगड गावाजवळ रामगड हा छोटेखान किल्ला आहे. रामगड हा पालगडचा जोडकिल्ला असून आजवर या किल्ल्याची स्थाननिश्चिती झाली नव्हती. महाराष्ट्रात आता दोन रामगड असून पहिल देवगड तालुक्यात आहे, तर दुसरा रामगड हा रत्नागिरी जिल्ह्यात आगे. या किल्ल्याची बांधणी कोणत्या काळात झाली याबाबात माहिती मिळालेली आहे. परंतु पालगड किल्ल्यासोबतच हा रामगड बांधला असावा अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
पुरातत्त्व अभ्यासकांनी दिली माहिती
या रामगड किल्ल्याच्या सॅटेलाइट इमेज सुद्धा काढण्यात आल्या आहेत. काही बांधकामाचे अवशेष दिसले आहेत. सर्वेक्षणात किल्लाचा दरवाजा, दोन संरक्षक बुरूज, काही थडगी, भांड्यांचे तुकडे मिळाले आहेत. किल्ल्याची तटबंदी आणि दरवाजा पूर्णपणे उद्धवस्त झाला आहे. अशी माहिती पुरातत्त्व अभ्यासकांनी दिली आहे.