लॉकडाऊन काळात तृतीयपंथीयांना मदत 

मुकुल माधव फाउंडेशन आणि क्रिएटिव्ह फाउंडेशनच्या वतीने तृतीयपंथीय भगिनींना किराणा किट व आरोग्य किट वाटण्यात आले.

 

मुकुल माधव फाउंडेशन आणि क्रिएटिव्ह फाउंडेशनच्या वतीने तृतीयपंथीय भगिनींना किराणा किट व आरोग्य किट वाटण्यात आले. क्रिएटिव्ह फाउंडेशनने कोविड योद्धाच्या आरोग्याची काळजी वाहण्याचे ठरवले व समाजातील दुर्लक्षित घटकांना आवश्यक मदत करण्याचा निर्धार केला. त्यानंतर समाजातील विविध क्षेत्रातून मदतीचा हात पुढे येऊ लागला. त्यानुसार मुकुल माधव फाउंडेशनच्या सहकार्याने तृतीयपंथी भगिनींना मदत करण्यात आली. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते किराणा किटचे वाटप करण्यात आले. यावेळी क्रिएटिव्ह फाउंडेशनच्या विश्वस्त नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, विशाल भेलके, मुकुल माधव फाउंडेशनच्या यास्मिन शेख, योगेश रोकडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here