पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नागपूरमध्ये समृद्धी महामार्गाचे लोकार्पण करण्यात आले. समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्यातील प्रवासी वाहतुकीचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते.
( हेही वाचा : नागपूर-बिलासपूर ‘वंदेभारत एक्सप्रेस’ला पंतप्रधानांनी दाखवला हिरवा झेंडा)
पंतप्रधान मोदींचा समृद्धी दौरा
पंतप्रधानांच्या हस्ते समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण
नागपूर – बिलासपूर वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा
मोदींच्या हस्ते ७५ हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण
नागपूर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे राष्ट्रार्पण आणि नागपूर मेट्रो टप्पा II ची पायाभरणी करण्यात आली यावेळी पंतप्रधान मोदी यांनी मेट्रोमधून प्रवास करताना विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
पंतप्रधान मोदींचा व्हिडिओ व्हायरल
समृद्धी महामार्ग लोकार्पण सोहळ्यादरम्यान पंतप्रधान मोदींनी ढोल वाजवत उपस्थित तरुणांना प्रोत्साहन दिले. पंतप्रधान ज्या ठिकाणी भेट देतात तेथील पारंपरिक संस्कृतीचे दर्शन संपूर्ण देशाला घडवतात. अगदी त्याचप्रमाणे समृद्धी महामार्गाच्या कार्यदरम्यान पंतप्रधानांनी ढोल वाजवत आनंद व्यक्त केला.
Join Our WhatsApp CommunityA traditional welcome in Nagpur, Maharashtra. pic.twitter.com/v1Yw75v1o3
— PMO India (@PMOIndia) December 11, 2022