राज्यातील ऐतिहासिक वारसा असणाऱ्या गड, किल्ल्यांच्या संवर्धनासाठी प्रतापगडावर मशाल महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यभरातून हजारो शिवभक्त प्रतापगडावर हजेरी लावून या मशाल महोत्सवाचा आनंद घेत आहेत.
( हेही वाचा : किशोरी पेडणेकरांची पुन्हा चौकशी होणार; सोमय्यांनी केले ‘हे’ आरोप )
जय भवानी, जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय हा जयघोष करून प्रतापगडावर मशाली प्रज्वलित करण्यात आल्या.
प्रतापगड किल्ल्याच्या चहुबाजूंनी विद्युत रोषणाई सुद्धा करण्यात आली आहे. भवानी माता मंदिरासपासून बुरूदापर्यंत लावण्यात आलेल्या मशालींमुळे गड उजळून निघाला आहे. या नयनरम्य दृष्यामुळे प्रतापगडावर शिवकाळ अवतरल्याचा आभास होत आहे.
राज्यभरातील ४०० गडांच्या संवर्धनाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी प्रतापगडावर ४०० मशाली पेटवत महोत्सव आयोजित करण्यात आला.
४०० मशालींमुळे संपूर्ण प्रतापगड प्रकाशमय झाला होता.
या महोत्सवावेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.
Join Our WhatsApp Community