प्रतापगडावर अवतरला शिवकाळ; ४०० मशालींचा लखलखाट!

126

राज्यातील ऐतिहासिक वारसा असणाऱ्या गड, किल्ल्यांच्या संवर्धनासाठी प्रतापगडावर मशाल महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यभरातून हजारो शिवभक्त प्रतापगडावर हजेरी लावून या मशाल महोत्सवाचा आनंद घेत आहेत.

( हेही वाचा : किशोरी पेडणेकरांची पुन्हा चौकशी होणार; सोमय्यांनी केले ‘हे’ आरोप )

New Project 14 5

जय भवानी, जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय हा जयघोष करून प्रतापगडावर मशाली प्रज्वलित करण्यात आल्या.

New Project 15 2

प्रतापगड किल्ल्याच्या चहुबाजूंनी विद्युत रोषणाई सुद्धा करण्यात आली आहे. भवानी माता मंदिरासपासून बुरूदापर्यंत लावण्यात आलेल्या मशालींमुळे गड उजळून निघाला आहे. या नयनरम्य दृष्यामुळे प्रतापगडावर शिवकाळ अवतरल्याचा आभास होत आहे.

New Project 17 2

राज्यभरातील ४०० गडांच्या संवर्धनाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी प्रतापगडावर ४०० मशाली पेटवत महोत्सव आयोजित करण्यात आला.

New Project 18 3

४०० मशालींमुळे संपूर्ण प्रतापगड प्रकाशमय झाला होता.

New Project 16 3

या महोत्सवावेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.