स्वातंत्र्यवीर सावरकरांची १३९ वी जयंती, मान्यवरांनी केले अभिवादन!

भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीसाठी आपले आयुष्य अर्पण करणारे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची १३९ वी जयंती दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात मोठ्या उत्साहात साजरी झाली.

भाजपचे मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक येथे वीर सावरकरांना अभिवादन केले.
राज्यसभा सदस्य विनय सहस्त्रबुद्धे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या १३९ व्या जयंती निमित्ताने त्यांना अभिवादन केले.
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या १३९ व्या जयंतीनिमित्त महानगरपालिका सभागृहात सहायक आयुक्त (प्रभारी) शिवदास गुरव यांनी वीर सावरकरांना अभिवादन केले. याप्रसंगी महानगरपालिका उप – सचिव सईद कुडाळकर, महापौरांचे स्वीय सचिव भाग्यश्री नलावडे हे मान्यवर उपस्थित होते.

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here