ATMच्या शोधाची भन्नाट कहाणी

93

याआधी खिशात पैसे नसतील, तर बाहेर पडणे शक्य नव्हते. पण, ATM च्या शोधानंतर मात्र हे बदलले. आता तुम्हाला हवे तिथे तुम्ही ATM मधून पैसे काढू शकता. आता खिशात ATM कार्ड नाही, असा माणूस क्वचितच सापडेल. अवघे काही बटणं क्लिक केल्यानंतर, क्षणात पैसे बाहेर येतील हे केवळ एक स्वप्न असताना, आता शहरांत काय खेड्या-पाड्यातही ATM बाहेर रांगा लागलेल्या दिसतात.

या ATM चा शोध नक्की लावला तरी कोणी? एका क्लिकवर पैसे मिळू शकतात, अशी भन्नाट कल्पना कोणाच्या डोक्यात आली? याची माहिती आपण घेऊया.

New Project 2022 05 16T163935.522

ATM चे संशोधक मूळ भारतीय होते

मानवाने आपले जीवन सुखकर बनवण्यासाठी वेळोवेळी अनेक शोध लावले आहेत. त्यातीलच एक शोध म्हणजे ATM. या मशीनच्या शोधाचे जनक स्काॅटलंडचे जाॅन शेफर्ड बॅरन हे आहेत. तर जगातील पहिल्या ATM च्या वापराचा मान पटकावला तो लंडन या शहराने.

New Project 2022 05 16T164245.495

तुम्हाला माहिती आहे का? ATM चा शोध लावणारे जाॅन शेफर्ड हे मुळ भारतीय वंशाचे आहेत. जाॅन शेफर्ड यांचा जन्म भारतात झाला होता. 23 जून 1925 साली मेघालय येथे त्यांचा जन्म झाला. जाॅन यांचे वडील स्काॅटलीश होते, त्यांचे नाव विलफ्रिड बॅरन होते. जाॅन यांच्या जन्मावेळी ते चिटगाव पोर्ट कमिश्नरचे चीफ इंजिनीअर होते.

New Project 2022 05 16T164411.452

अशी सुचली जाॅन शेफर्ड यांना ATM मशीनची कल्पना

एकदा जाॅन पैसे काढण्यासाठी बॅंकेत गेले, पण बॅंकेत पोहोचताच बॅंक बंद झाली. तेव्हा जाॅन यांना वाटले की, अशी एखादी मशीन असती ज्यातून आपण हवे तेव्हा पैसे काढू शकलो असतो तर बरे झाले असते. जाॅन शेफर्ड यांची लहानपणापासूनच विज्ञानाशी मैत्री होती. वैज्ञानिक शोध लावणे हा त्यांच्या आवडीचा विषय होता. त्यामुळे मनात आलेला विचार सत्यात उतरवण्यासाठी त्यांनी वेळ न दवडता थेट प्रयोगाला सुरुवात केली.

New Project 2022 05 16T164606.753

याआधी अशा मशीनचा एकही शोध लागला नसल्याने, त्यांना ही मशीन बनवताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. मशीनचा आकार कसा असावा? त्यामध्ये पैसे कसे भरता येतील? समोरची व्यक्ती ते पैसे कसे काढू शकेल? अशा अनेक अडथळ्यांचा त्यांना सामना करावा लागला. मात्र त्यांनी आपल्या जिद्दीच्या जोरावर या सगळ्या प्रश्नांची उत्तरे यशस्वीरित्या मिळवली. अनेक वर्षांच्या मेहनतीनंतर, मात्र त्यांना यश मिळाले आणि जगात जन्म झाला तो पहिल्यावहिल्या ATM मशीनचा. ATM ची पहिली मशीन लंडनच्या बार्कलेज बॅंकेच्या एका शाखेत, 27 जून 1967 ला लावण्यात आली.

( हेही वाचा :‘रसना गर्ल’ ; जन्म, मृत्यू, वय आणि १४चा आकडा )

( हेही वाचा: दिल से ‘चहा’ है तुम्हे! देशभरातील या विविध चहांचा आस्वाद तुम्ही घेतलात का? )

भारतात सर्वात पहिली ATM मशीन 1987 मध्ये लावण्यात आली

  • मुंबईच्या हाॅंगकाॅंग अॅण्ड शांघाई बॅंकिंग काॅर्पोरेशनने पहिले ATM बसवले.
  • काळानुसार ATM च्या मशिनच्या आकारात बदल झाले, नवी प्रणाली आली.
  • एटीएममधील चकाचक वातावरण, अद्यावत यंत्रणा इतकेच, नव्हे तर प्रशस्त स्क्रीन हे बदल झाले.
  • सध्या गल्लोगल्लीत ही सुविधा उपलब्ध झाल्याने मोठी क्रांती झाली आहे.

New Project 2022 05 16T165108.050

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.