कॅटरिंग पॉलिसी अंतर्गत मध्य रेल्वेने नवनव्या संकल्पना राबवण्यास सुरुवात केली आहे. त्या अंतर्गत मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे ‘रेस्टॉरंट ऑन व्हील्स’ स्थापन केले आहे. भंगारातील रेल्वे कोच वापरून हे रेस्टॉरंट बनवण्यात आले आहे, जे या भागातील खाद्यालय बनले आहे. रूळांवर ठेवलेला हा ‘रेस्टॉरंट कोच’ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील हेरिटेज गल्ली येथे, प्लॅटफॉर्म क्रमांक १८ च्या समोर आहे. हेरिटेज गल्लीमध्ये नॅरोगेज लोकोमोटिव्ह्ज, जुन्या प्रिंटिंग प्रेसचे भाग इत्यादींसह विविध रेल्वे कलाकृती आहेत. “रेस्टॉरंट ऑन व्हील्स” जेवणासाठी एक उत्तम ठिकाण असणार आहे. इथे ग्राहकांना एक अनोखा अनुभव मिळणार आहे. या कोचमध्ये १० टेबलसह ४० व्यक्ती राहतील. रेस्टॉरंटचे आतील भाग अशा प्रकारे सजवले गेले आहे की, ग्राहकांना रेल्वे डब्यात बसून जेवण करत असल्याचा अनुभव घेता येणार आहे.
Join Our WhatsApp Community