Tulip garden : जम्मू आणि काश्मीरचे ‘ट्यूलिप गार्डन’ पर्यटकांना खुणावते

289
काश्मीरच्या ‘ट्यूलिप गार्डन’ने (Tulip garden) त्याच्या अनोख्या वातावरणासह मोहक सौंदर्यामुळे वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड (लंडन) मध्ये नोंद केली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी आणि वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डचे संपादक यांनी काश्मीरला भेट दिली आणि येथील फ्लोरिकल्चर विभागाच्या अधिकाऱ्यांचे कौतुक केले. पर्वत, कुरण आणि अनेक बागा या नैसर्गिक सौंदर्यामुळे काश्मीर खोऱ्याला पृथ्वीचे नंदनवन म्हणून ओळखले जाते.
गेल्या काही वर्षांपासून ‘सिराज बाग’ या नावाने ओळखल्या जाणार्‍या ट्यूलिप गार्डन (Tulip garden) ला भेट द्यायला जगभरातून दरवर्षी लाखो पर्यटक येतात. काश्मीर खोऱ्यातील पर्यटकांना आकर्षित करण्यास या बागेचा मोठा वाटा आहे. फुलशेती विभागाचे अत्यंत कौतुकास्पद पाऊल आहे, ज्यामुळे ट्यूलिप गार्डन तसेच संपूर्ण विभागाला भविष्यात नवीन उंची प्राप्त होईल. झाबरवान पर्वतश्रेणीच्या पायथ्याशी वसलेले हे आशियातील सर्वात मोठे ट्यूलिप हेवन म्हणून ओळखले जाते.
श्रीनगर टुरिझमच्या मते, काश्मीर खोऱ्यातील फुलशेती आणि पर्यटनाला चालना देण्याच्या उद्देशाने हे उद्यान २००७ मध्ये उघडण्यात आले होते. हे उतार असलेल्या जमिनीवर बांधले आहे, ज्यामध्ये सात भाग आहेत. जम्मू आणि काश्मीर प्रशासन दरवर्षी ट्यूलिप महोत्सव आयोजित करते, ज्याचा उद्देश पर्यटन व्यवसायाला चालना देणे हा आहे. दरवर्षी वसंत ऋतूच्या प्रारंभाच्या वेळी बागेतील फुलांचे प्रदर्शन आयोजित केले जाते.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.