ठाण्यात लाल चिखल!

नाशिकहुन मुंबईकडे २० टन टोमॅटोचा माल घेऊन ट्रक निघाला होता.

 

ठाण्यातील कोपरी पुलावर शुक्रवारी, १६ जुलै रोजी पहाटे 3 वाजता टॉमटोने भरलेला ट्रक उलटला आणि संपूर्ण रस्ता टोमॅटोमय झाल्यामुळे रस्ता जाम झाला होता. सकाळी 8 वाजता ट्रक आणि टोमॅटोचा खच बाजूला केल्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली. के.व्ही. गिरीश यांच्या मालकीचा असलेला ट्रक नाशिकहुन मुंबईकडे २० टन टोमॅटोचा माल घेऊन निघाला होता. पहाटे ३ वाजताच्या सुमारास पूर्व द्रुतगती महामार्गवरील ठाण्यातील कोपरी पुलावर हा ट्रक उलटला. त्यामुळे मुंबईकडे जाणारी वाहतून पूर्णपणे ठप्प झाली. ठाण्यातील पाचपाखाडीपर्यंत वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. अखेर क्रेन आणि जेसीबीच्या मदतीने टोमॅटोचा खच आणि ट्रक बाजूला करण्यात आला. सकाळी ८ वाजता कोपरी पुलावरून मुंबईकडे जाणारी वाहतूक सुरळीत झाली.

(हेही वाचा : यंदाचा दहावीचा निकाल ९९.९५ टक्के!)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here