स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात ‘अनबिलिव्हेबल सावरकर’

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात ‘अनबिलिव्हेबल सावरकर’ भगूर ते अंदमान या विषयावर आधारित योगेंद्र आर. पाटील यांचे चित्रप्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. शुक्रवार, २४ फेब्रुवारी २०२३ या दिवशी सकाळी ११ वाजता या चित्रप्रदर्शानाचे उद्घाटन स्वातंत्र्यवीर सावरकरांची नात असिलता सावरकर – राजे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाच्या कोषाध्यक्ष मंजिरी मराठे, जे.जे. उपयोजित कला महाविद्यालयाचे प्रा. डॉ. गजानन शेपाल, ललित कला केंद्राचे प्राचार्य राजेंद्र महाजन, पाचोरा येथील श्रेयस मेडिकल फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. जयंत पाटील आणि अंजली गवळी उपस्थित होत्या. हे प्रदर्शन सर्वांना २४ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारीपर्यंत स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात विनामूल्य पाहता येणार आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here