अंदमानात लाईट अॅण्ड शो बघण्यासाठी सावरकरप्रेमींची गर्दी 

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या ५७व्या आत्मार्पण दिनानिमित्ताने मोठ्या संख्येने सावरकरप्रेमी अंदमानात दाखल झाले. ज्या ठिकाणी वीर सावरकर यांनी आपल्या मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी काळ्यापाण्याची शिक्षा भोगताना असह्य वेदना सहन केल्या. त्या भूमीत जाऊन सावरकरप्रेमी यांनी सेल्युलर जेलमधील वीर सावरकर ज्या कोठडीत होते, त्या कोठडीला नमन केले. यानिमित्ताने या ठिकाणी आधुनिक लाईट अँड शो सुरु झाला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे कार्य आणि स्वातंत्र्य संग्रामाचा इतिहास सांगणा-या या लाईट अँड शो चा आनंद मोठ्या संख्येने सावरकरप्रेमींनी घेतला.

(हेही वाचा वीर सावरकरांचा अवमान करणाऱ्या राहुल गांधींचा निषेध करत फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना सवाल)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here