अमरावतीतून बाईक रॅली काढून सावरकरप्रेमींची भगूर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाला भेट

स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकरप्रेमी, अमरावती या मंडळाच्या वतीने अमरावती येथील नगरसेवक अजय पाटील सारस्कर यांच्या नेतृत्वाखाली अमरावती ते भगूर बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. 7 जानेवारी 2023 रोजी अमरावती येथून प्रस्थान करून या बाईक रॅलीचे सोमवारी, 9 जानेवारी रोजी सकाळी स्वातंत्र्यवीर सावरकर जन्मभूमी भगूरमध्ये आगमन झाले. यावेळी अजय सारस्कर यांनी वीर सावरकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला.

या बाईक रॅलीत अजय पाटील सारस्कर यांच्यासह अक्षय जळीत, प्रेमेंद्र बसरैय्या, शुंभासु भेंडारकर, सिद्देश दलाल, यश मेंडे, हिमांशू दोशी, देवासी दलाल, मेजर राजेंद्र सिंग बहोल, यश जाळीत सहभागी झाले होते. या अभिवादन यात्रेचे भगूरमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने राजेंद्र देशपांडे, मनोज कुवर, भूषण कापसे, मंगेश मरकड, आकाश नेहरे यांनी तसेच मधुकर कापसे, विलास कुलकर्णी, प्रसाद आडके, शेखर कस्तुरे आदी भाजपा कार्यकर्त्यांनी स्वागत केले. याप्रसंगी नाशिक शहरातून प्रसाद धोपावकर, अजिंक्य साने, सुजाता जोशी आदी सावरकरप्रेमी उपस्थित होते.

अमरावती येथे निघण्यापूर्वीची बाईक रॅलीची छायाचित्रे

वीर सावरकर यांचे जन्मस्थळ भगूर येथे पोहचल्यानंतरची छायाचित्रे 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here