राजपथावर आयोजित 73 व्या प्रजासत्ताक सोहळ्यात सहभागी झालेल्या महाराष्ट्राच्या चित्ररथातून जैवविविधतेचे दर्शन झाले. हा चित्ररथ जैवविविधता मानके विषयावर आहे. महाराष्ट्राच्या चित्ररथामध्ये आपल्याला महाराष्ट्राचा राज्यप्राणी ‘शेकरू’ ‘ब्ल्यू मॉरमॉन’ फुलपाखरू, मोर तसेच विवीध अभयारण्यातील दुर्मिळ होत असलेल्या वनस्पती व प्राण्यांच्या प्रजाती अशी जैवविविधता दाखवणारा चित्ररथ आपल्याला राजपथावर होणाऱ्या संचलनात पाहायला मिळाला. या चित्ररथाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देखील दिला आहे.ब्ल्यू मॉरमॉन या विशेष प्रजातीची राज्य फुलपाखरू म्हणून घोषणा करणारे महाराष्ट्र हे प्रथम राज्य आहे. महाराष्ट्रातील हीच जैवविविधता चित्ररथाच्या माध्यमातून मांडण्यात येणार आहे.या चित्ररथाची संकल्पना, सांस्कृतिक कार्य संचालनालयाची आहे. महाराष्ट्रातील वैविध्यपूर्ण जैव वारसा कवितेच्या व मधुर संगीताच्या रूपात मांडण्यात आला