जगातील सर्वात उंच शिवमूर्तीचे लोकार्पण; ३९६ फूट उंच ‘विश्वास स्वरूपम’ पहा फोटो

राजस्थानमध्ये भगवान शंकराच्या ३९६ फुटी उंच मूर्तीचे लोकार्पण करण्यात येणार आहे. ही जगातील सर्वात उंच शंकराची मूर्ती आहे. राजस्थानमधील नाथद्वारा येथे ही मूर्ती उभारण्यात आली आहे. या उंच मूर्तीला ‘विश्वास स्वरुपम’ असे नाव देण्यात आले आहे. हा संपूर्ण कार्यक्रम २९ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबरपर्यंत सुरू असणार आहे.

( हेही वाचा : “…ज्यांनी पोलिसांना सुद्धा सोडलं नाही, चोराच्या उलट्या बोंबा”; विरोधी पक्षांच्या नेत्यांची नार्को टेस्ट करा भाजपची मागणी)

राजस्थनामध्ये ३६९ फूट उंचीच्या शिवप्रतिमेचे शनिवारी लोकार्पण होणार आहे. या भव्य शिवमूर्तीला विश्वास स्वरूपम असे संबोधले जाते. नाथद्वाराच्या गणेश टेकडीवर ही भव्य मूर्ती आहे. या मूर्तीमध्ये भगवान शंकर ध्यान मुद्रेमध्ये बसलेले आहेत. ही मूर्ती तयार करण्यासाठी १० वर्षे कालावधी लागला आहे. २०१२ मध्ये ही मूर्ती उभारण्याची योजना आखली होती आता २०२२ मध्ये ही मूर्ती तयार झाली आहे.

जगातील सर्वात उंच पाच शिवमूर्ती

  • विश्वास स्वरूपम – राजस्थान ३६९ फूट
  • कैलाशनाथ महादेव मंदिर, नेपाळ – १४३ मीटर
  • मुरूडेश्वर मंदिर कर्नाटक – १२३ मीटर
  • आदियोग मंदिर तामिळनाडू – ११२ मीटर
  • मंगल महादेव – मॉरीशस – १०८ मीटर

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here