शिखांना भडकवण्याचं ‘इस्लामी’ कारस्थान… कोण आहे यामागचं पाकिस्तानी ‘प्यादं’?

90च्या दशकात काश्मीरमध्ये हिंदू आणि शीखांची निर्घृण कत्तल करणारे इस्लामी कट्टरतावादी, आता शीखांचे हितचिंतक बनत आहेत. खलिस्तानी आतंकवाद्यांविरोधात करण्यात आलेल्या ऑपरेशन ब्लू स्टारला नुकतीच 37 वर्ष पूर्ण झाली. याच पार्श्वभूमीवर काश्मीरमध्ये सध्या थंड असलेल्या हुर्रियत कॉन्फरन्सच्या तथाकथीत प्रवक्त्याने, आता पाकिस्तानी वृत्तपत्राच्या माध्यमातून खलिस्तानी संघटनांना आपले समर्थन दिले आहे. हुर्रियतची पाकिस्तान सोबत असलेली सलगी ही जगजाहीर आहे. त्यामुळे आता सिख फॉर जस्टिस संघटनेच्या माध्यमातून पंजाबमधील स्थानिक गुन्हेगारांना हाताशी धरुन, शेतकरी आंदोलनाला जीवंत ठेवण्याचा प्रयत्न हे हुर्रियतचं भारताविरुद्ध फार मोठं षडयंत्र आहे.

खलिस्तानी आतंकवादी विदेशातून भारतात समाजविघातक कारवाया करुन, अशांतता पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. या कामात पाकिस्तानी प्याद्यांकडून त्यांना मोठ्या प्रमाणात मदत मिळत आहे. याबाबतचे पुरावे सुद्धा आता समोर येऊ लागले आहेत. ऑपरेशन ब्लू स्टारच्या 37व्या वर्षपूर्तीनिमित्त हुर्रियत कॉन्फरन्सच्या प्रवक्त्याने शीख समुदायाप्रती सहानुभूती व्यक्त केली. इस्लामी कट्टरतावादी हुर्रियत कॉन्फरन्स शीख, दलित आणि ख्रिश्चनांना अल्पसंख्यांकांच्या नावाखाली आपल्यासोबत जोडण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठी कुमक पुरवण्याचं काम करत आहे तो म्हणजे, सिख फॉर जस्टिसचा म्होरक्या गुरपतवंत सिंह पन्नू. पन्नू अमेरिकेतून मोठ्या प्रमाणावर या मोहिमेला मदत करत आहे. त्याच्यासोबतच कॅनडातील चो धालीवाल, गुरमीत सिंग, अनीता लाल हे सुद्धा हे काम करत आहेत.

पाकिस्तानचा ‘के-2’ प्रोजेक्ट

पाकिस्तान गेल्या अनेक वर्षांपासून अमिबाप्रमाणे छद्मी पावले टाकत, आतंकवादी कारवायांना प्रोत्साहन देत आहे. यातच खलिस्तानी चळवळ ही अमेरिकेसाठी एक शस्त्र बनली आहे. अनेक वर्ष मृतावस्थेत असलेल्या या चळवळीला नवसंजीवनी मिळाल्याप्रमाणे, ती आता पुनर्जीवित झाली आहे. यासाठी विदेशातील शीख समुदायाशी संलग्न असलेल्या लोकांना आपल्या हातचं बाहुलं बनवलं जात आहे. पाकिस्तान ‘काश्मीर’ आणि ‘खलिस्तानच्या’ माध्यमातून भारतात छुपे ‘के-2’ युद्ध रचत आहे.

370 आणि 35-ए कलम समाप्ती नंतर, जम्मू-काश्मीरमधील आतंकवादाची नांगी ठेचली गेली. त्यामुळे मुंडकं छाटलेल्या बोकडाप्रमाणे तडफडणा-या पाकिस्तानने, भारताच्या नागरिकत्त्व कायद्याला आपली ढाल बनवण्याचा प्रयत्न सुरू केला. यासाठी शाहीनबाग मधील तथाकथीत आंदोलनाला पैसा पुरवून, हे आंदोलन अधिक काळ चालवण्यात आलं. या आंदोलकांना बिर्यानी आणि मुर्ग मुसल्लमची जय्यत मोजवानी आणि रोजगार मिळत होता. हे आंदोलन आता शमले असल्याने, पाकिस्तानचा तीळपापड होत आहे.

सीख फॉर जस्टिसच्या पन्नूचे षडयंत्र 

अमेरिकेतील गुरपतवंत सिंह पन्नू स्वतंत्र खलिस्तानच्या नावाखाली, पंजाबात विद्रोहाचे बीज रोवण्याचा प्रयत्न करत आहे. रेफरेंडम 2020च्या माध्यमातून जगभरातील शीखांचे जनमत एकत्रित करुन, पंजाबला स्वतंत्र खलिस्तानी राष्ट्र बनवण्याच्या प्रयत्नात तो आहे. यासाठी त्याला पाकिस्तानकडून पैसे आणि इतर सर्व प्रकारची मदत मिळत आहे. पण तरीसुद्धा आपल्या या प्रयत्नांना यश मिळत नसल्याने, त्याने आता आपले डावपेच मागील काही महिन्यांपासून वेगाने बदलायला सुरुवात केली आहे. जसे की,

  • शेतकरी आंदोलनाला आर्थिक सहाय्य करत, भारत सरकारला विरुद्ध शीख समाजात असंतोष पसरवणे
  • या आंदोलनात खलिस्तानी झेंडे, टी-शर्ट आणि आतंकवादी भिंद्रावालेचा प्रचार करणे
  • पंजाबातील स्थानिक गुन्हेगारांना हाताशी धरुन दहशत निर्माण करणे
  • बलविंदर सिंह संधू सारख्या खलिस्तान विरोधकांची हत्या करणे
  • ऑपरेशन ब्लू स्टारला ‘अमृतसरचा नरसंहार’ म्हणून घोषित करुन लोकांमध्ये भ्रम निर्माण करणे
  • न्यूयॉर्क, कॅनडामधील भारतीय दूतावासांवर शीख खंडा किंवा भारतीय तिरंग्याच्या नावाने मोहीम चालवणे, भारताची बदनामी करणे

म्हणून पन्नू पाकिस्तानचं ‘प्यादं’

भारतात भारतीय नागरिकाला मिळणारे सर्व अधिकार शीख समुदायाला सुद्धा मिळत आहेत. त्यामुळे भारतीय शीख गुण्या-गोविंदाने भारतात नांदत आहेत. पण तरी सुद्धा पन्नू भारतीय शीखांना भडकवण्याचे काम करत आहे. पण दुसरीकडे पाकिस्तानात शीख समुदायावर होणा-या अत्याचारांबाबत बोलायला पन्नूची जीभ झडते. पाकिस्तानातील प्रध्यापक कल्याण सिंह यांच्या म्हणण्यानुसार, पाकिस्तानात शीखांची संख्या झपाट्याने कमी होताना दिसत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे शीखांचे जबरदस्ती करण्यात येणारे धर्मपरिवर्तन…

पाकिस्तानात शीख बांधवांची हत्या करण्यात येत आहे, त्यांच्या घरातील स्त्रियांचे धर्मपरिवर्तन करुन, मुस्लिमांसोबत त्यांचा जबरदस्तीने, इच्छेविरुद्ध विवाह लावून देण्यात येत आहे.

याबाबतची माहिती देणारा पाकिस्तानी अमेरिकी फातिमा गुल यांचा हा व्हिडिओ… यात त्यांनी सिंध प्रांतातील अल्पसंख्यांच्या वेदनादायी परिस्थितीचे दर्शन घडवले आहे. असे सगळे असताना सुद्धा, भारतातील पळपुट्या शीखांना पाकिस्तानातील शीख आणि अल्पसंख्यांकांवर होणारे अत्याचार, त्यांचं केलं जाणारं धर्मपरिवर्तन दिसत नाही. फाळणीनंतर मुस्लीम लीगच्या लोकांनी त्यांच्या पूर्वजांची कशाप्रकारे हत्या केली, महिलांवर अत्याचार करुन कुटुंबच्या कुटुंब उध्वस्त केली आणि जीव मुठीत धरुन त्यांचे पूर्वज भारताच्या आस-याला का आले, याचा सुद्धा त्यांना विसर पडला आहे. शेवटी झोपेचं सोंग घेणा-यांना जाग येणं कठीणच… पण त्यांची ही निद्रावस्था कधी त्यांच्यासाठी चिरनिद्रा ठरेल, याचा काही नेम नाही.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here