व्हर्च्युअल मोडमध्ये होणार शिवसेनेचा दसरा मेळावा 

293

मुंबई – शिवसेनेचा पारंपरिक दसरा मेळावा यावेळी वेगळ्या पद्धतीने साजरा होण्याची शक्यता आहे, शिवसेना दरवर्षी दादरच्या शिवाजी पार्क येथे दसरा मेळावा आयोजित करत असते, पण या वेळी कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आपल्या दसरा मेळाव्याला देत आहे अर्थात डिजिटल व्यासपीठावरून यंदा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शिवसैनिकांना मार्गदर्शन  करणार आहेत.

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला देशाच्या कानाकोपऱ्यातून हजारो शिवसैनिक येत असतात, त्यामुळे शिवाजी पार्क तुडुंब भरते. मात्र यंदा देशासह राज्यात सर्वत्र कोरोनाने थैमान घातले आहे. अशा परिस्थितीत शिवसेना दसरा मेळावा घेऊन धोका पत्करणार नाही. आधीच देशाच्या तुलनेत महाराष्ट्र्रात कोरोनाबाधित रुग्ण संख्या आणि मृतांची संख्या जास्त आहे, त्यामुळे विरोधी पक्ष भाजप हा शिवसेनेला कायम या परिस्थितीसाठी जबाबदार धरत आहे. अशा वेळी  शिवसेनेने दशहरा मेळाव्याचे  स्वरूपात आयोजन केले आणि  कोरोनाबाधित रुग्ण संख्या वाढली तर सेनेला फार मोठे राजकीय नुकसान सहन करावे लागेल. म्हणून यंदा हा मेळावा डिजिटल व्यासपीठावर होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ ऑक्टोबरपर्यंत कोरोनासंबंधी परिस्थितीचा आढावा बैठक होणार आहे. त्यानंतर पक्ष प्रमुख या मेळाव्याच्या आयोजनाबाबत पुढील निर्णय घेणार आहेत.

ठाकरे कुटुंबिय आणि शिवाजी पार्क यांच्यातील नाते 

ठाकरे कुटुंबाचा शिवाजी पार्कशी जवळचा संबंध आहे. शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी पहिला मेळावा २७ नोव्हेंबर १९६६ रोजी शिवाजी पार्क येथे घेतला होता, तेव्हापासून आजतागायत याच मैदानावर सेनेचा दसरा मेळावा होत आलेला आहे. शिवसेनाप्रमुखांनी शिवसेनेचे नेतृत्व उद्धव ठाकरे यांच्या हाती सोपवले आणि नातू आदित्य ठाकरे यांना  सेनेची जबाबदारी दिली, त्याचे हे मैदानही साक्षीदार आहे. त्याच बरोबर १९९५ मध्ये जेव्हा शिवसेनेचा पहिला मुख्यमंत्री झाला तेव्हा त्यांचा शपथविधीही याच मैदानात झाला होता. त्यानंतर जेव्हा स्वतः उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तेव्हादेखील त्यांनीही याच मैदानात शिवसैनिकांच्या उपस्थितीत शपथ घेतली. २०१५ साली एक जनहित याचिकेवर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने या मैदानात कोणत्याही राजकीय पक्षाच्या सभांना परवानगी न देण्याचा आदेश दिला. या सभांमुळे येथे ध्वनिप्रदूषण होते आणि हा परिसर शांतता क्षेत्रात येतो, असा युक्तिवाद करण्यात आला. तेव्हा शिवसेनेकडून या सभेत ६० डिग्रीपेक्षा अधिक आवाज केला जाणार नाही, त्यावेळी उच्च न्यायालयाने यंदाच्या वर्षी सभा घ्या मात्र पुढच्या वर्षी पर्यायी व्यवस्था करावी लागेल. मात्र राज्यात युतीचे सरकार होते, त्यामुळे दशहरा मेळाव्याला राजकीय सभेऐवजी सांस्कृतिक स्वरूप देण्यात आले. ठाकरे कुटुंबाच्या आनंदाचे हे मैदान जसे साक्षीदार बनले, तसे २०१२ साली शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर दुःखाचेही साक्षीदार बनले होते. स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्यावर याच मैदानात अंतिम संस्कार करण्यात आले आणि त्यावेळी लाखोंच्या संख्येने शिवसैनिक या मैदानात जमले होते.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.