शिवसेनेत आता खासदारही नाराज?

241
५५ आमदार संख्या असलेल्या शिवसेनेतून ३५ आमदार नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी फोडले आहेत. त्यांना घेऊन ते महाराष्ट्राच्या बाहेर गेले आहेत, त्यामुळे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आले. हे सरकार वाचवण्यासाठी अखेरचे प्रयत्न जोरदार सुरु झाले आहेत. त्यानुसार शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना खासदारांची बैठक बोलावली. या बैठकीत मात्र अर्ध्याहून अधिक खासदार गैरहजर राहिले होते, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली.
त्यामुळे शिवसेनेला हा आणखी मोठा धक्का आहे का, अशी चर्चा सुरु झाली आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या बंडखोरीनंतर खासदार भावना गवळी, खासदार प्रताप जाधव यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे लेखी नाराजी व्यक्त केली. त्यामुळे शिवसेनेत आता खासदारही नाराज आहेत, असा संदेश मिळत आहेत.

शिवसेनेचे बंड मोडून काढण्यासाठी शरद पवारांचा पुढाकार 

शिवसेनेतील हे बंड मोडून काढण्यासाठी आता खुद्द एनसीपीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुढाकार घेतला आहे. यासाठी शरद पवार यांनी थेट मातोश्री येथील बंगला गाठला आणि दोन तास बैठक घेतली. या बैठकीनंतर पवार यांनी थेट यशवंत चव्हाण सेंटर येथे गेले. मात्र दुसरीकडे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी हे विधिमंडळात गेले आहेत, तिथे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याशी चर्चा केली आहे. यावेळी एकनाथ शिंदे यांच्या गटाचे बंड मोडून काढण्यासाठी घटनात्मक तरतुदी काय आहेत, हे तपासण्यात येत आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.