संविधानाला बाजूला सारुन काँग्रेसने आतंकवाद्याप्रमाणे सरकार चालवले – चंद्रशेखर बावनकुळे

224

सरकारविरोधात आवाज उठवल्यावरती केंद्र आणि राज्य सरकार कारवाई करते, असे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल म्हणाले होते. याच पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बोलताना काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. संविधानाला बाजूला सारुन काँग्रेसने आतंकवाद्याप्रमाणे सरकार चालवले, अशी गंभीर टीका बावनकुळेंनी केली आहे.

प्रसार माध्यमांसोबत बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, ‘सरकार असताना काँग्रेसने किती गैरवापर केला, याची मी ५० ते १०० उदाहरणे देईन. या देशावर आणीबाणीची वेळ काँग्रेसने आणली होती. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाला बाजूला सारुन काँग्रेसने आणीबाणी लादली. काँग्रेस क्रूर वागले, वैयक्तिक फायद्यासाठी घटनेचे त्यांनी उल्लंघन केले. आकांडतांडव करून आतंकवाद्याप्रमाणे सरकार चालवले. आता जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारतात काँग्रेसविरोधात प्रचंड रोष आहे. राज्यात शिंदे फडणवीसांच्या सरकारमुळे हे बावचळले आहेत. उद्याच्या काळातही त्यांना अंधार दिसतोय. तसेच २०२४च्या निवडणुकीत शिंदे-फडणवीसांच्या समन्वयाने मोदींच्या नेतृत्वात २०० हून अधिक विधानसभा निवडणूक येणार आहेत. त्यामुळे आता ते घाबरले आहेत.’

दरम्यान ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांचा देशातील लोकशाहीसाठी व्यासपीठ उभा करण्याचा विचार आहे. आणि याला ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांकडून आणि विरोधकांवर टीकास्त्र सोडले जात आहे.

(हेही वाचा – एकाच घरात मुख्यमंत्री आणि मंत्रीपद याच्यामुळे गद्दारी; ठाकरेंना त्यांच्याच खासदाराचा घराचा आहेर)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.