Assam मध्ये १ लाखांहून अधिक अवैध घुसखोर; मंत्री अतुल बोरा यांची माहिती

43
Assam मध्ये १ लाखांहून अधिक अवैध घुसखोर; मंत्री अतुल बोरा यांची माहिती
Assam मध्ये १ लाखांहून अधिक अवैध घुसखोर; मंत्री अतुल बोरा यांची माहिती

आसाममध्ये (Assam) १ लाख ६६ हजार अवैध घुसखोरांची ओळख पटली असून ३० हजार १०० हून अधिक घुसखोरांना राज्यातून हद्दपार करण्यात आले आहे. आसाम (Assam) कराराच्या अंमलबजावणीबाबत काँग्रेसचे आमदार अब्दुल रहीम अहमद (Abdul Rahim Ahmed) यांनी यासंदर्भात प्रश्न विचारला होता. त्यापार्श्वभूमीवर मंत्री अतुल बोरा (Atul Bora) यांनी याप्रकरणी माहिती मिळवली. दि. ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत आसाममध्ये अवैध घुसखोरी करणाऱ्यांची संख्या जवळजवळ १ लाख ६५ हजार ५३१ इतकी होती.

( हेही वाचा : Rajasthan मध्ये हिंदू मुली ठरल्या ‘लव्ह जिहाद’च्या शिकार; धर्मांध म्हणाला, तुमचा देव दगडाचा, आमच्या इस्लाममध्ये…

आसाम राज्य सरकारमधील मंत्री अतुल बोरा (Atul Bora) यांनी सांगितले की, १९६६ ते १९७१ दरम्यान अवैध घुसखोरांची संख्या ३२ हजार ८७० होती. तर १९७१ नंतर १ लाख ३२ हजार ६६१ अवैध घुसखोरांची संख्या झाली आहे. मंत्री बोरा पुढे म्हणाले की, आसामसंबंधित सेवानिवृत्त असलेले न्यायमूर्ती बिप्लब शर्मा (Biplab Sharma) समितीच्या एका अहवालानुसार, ६७ शिफारसीनुसार, ज्यात ५२ राज्य सरकारच्या अधिकार क्षेत्राच्या अंतर्गत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १९८५ मध्ये आसामच्या करारावर स्वाक्षरकी करण्यात आली होती. या करारात इतरही तरतुदीनुसार सांगण्यात आले की, २५ मार्च १९८५ मध्ये आसामच्या करारावर स्वाक्षरी करण्यात आली होती. या करारादरम्यान, इतरही तरतुद करण्यात आली. २५ मार्च १९७१ रोजी किंवा आसाममध्ये आलेल्या सर्व परदेशी लोकांना ओळखले जाईल आणि मतदार यादीतून त्याचे नाव वगळले जाईल. अशातच त्यांना हद्दपार करण्यासाठी पावले उचलली जातील.

भारत-बांगलादेश (India-Bangladesh) सीमेवर काटोरी तारांचे कुंपण बसवण्याबाबत एका वेगवेगळ्या प्रश्नाचे उत्तरही मंत्री अतुल बोरा (Atul Bora) यांनी दिले. बांगलादेशसोबतच्या एकूण २६७.५ किमीच्या आंतरराष्ट्रीय सीमेपैकी २२८. ५४१ किमीपर्यंत कुंपण घालण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.