देशात खताच्या किंमती स्थिर ठेवण्यासाठी केंद्र सरकारने महाराष्ट्राला १ लाख ३० हजार कोटी अनुदान दिले आहे. राज्यात बोगस बियाणे आणि खतांची विक्री करणाऱ्यांना चाप बसविण्यासाठी राज्य सरकार कडक कायदा तयार करणार आल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी विधानसभेत दिली.
बोगस बियाणे आणि खतांच्या संबंधी विधानसभा सभागृहात उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, देशात खतांच्या किंमती स्थिर राखण्यासाठी केंद्र सरकार विशेष प्रयत्न करते. खतांच्या किंमती स्थिर राखण्यासाठी केंद्र सरकारने १ लाख ३० हजार कोटी अनुदान दिलेले आहे.
(हेही वाचा – दादरच्या जलतरण तलावांमध्ये सर्पदर्शन : मंगळवारी पकडला धामण जातीचा साप)
तसेच बोगस बियाणे आणि खातांच्या विक्रीला चाप बसविण्यासाठी सरकार गंभीर आहे. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी तसेच बोगस बियाणे आणि खतांची विक्री करणाऱ्यांवर जरब बसविण्यासाठी राज्य सरकार कठोर कायदा करणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहात दिली.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community