झारखंडमधील 10 विधानसभा क्षेत्रात 100 टक्क्यांहून अधिक Muslim मतदारांची संख्या वाढली; भाजपाच्या अहवालामुळे खळबळ

141

झारखंडमधील 10 विधानसभा जागांवर अनेक बूथवरील मतदारांची संख्या पाच वर्षांत 100% पेक्षा जास्त वाढली आहे. झारखंड भाजपाने एका अहवालात हा खुलासा केला आहे. ज्या भागात मतदारांची संख्या वाढत आहे, त्यापैकी बहुतांश संताल परगणा या भागातील आहेत आणि याच भागात बांगलादेशी मुस्लीम (Muslim) घुसखोरीची सतत चर्चा होत असते.
या अहवालाच्या आधारे भाजपाने झारखंड निवडणूक आयोगाकडे चौकशीची मागणी केली आहे. तपास योग्य पद्धतीने झाला तर लोकसंख्या बदलण्याचे मोठे षडयंत्र समोर येईल, असे भाजपाने म्हटले आहे. भाजपाचा हा अहवाल त्रिसदस्यीय समितीने तयार केला असून, या समितीचे प्रमुख प्रदेश उपाध्यक्ष अवधेश कुमार आहेत.

भाजपाच्या अहवालात काय म्हटले? 

भाजपाने 2019 च्या लोकसभा निवडणुकीची मतदार यादी (Muslim) आणि 2024 च्या मतदार यादीचा तुलनात्मक अभ्यास केला आहे. गेल्या पाच वर्षांत झारखंडच्या 10 विधानसभा जागांच्या काही बूथवर (विशेषत: मुस्लिम लोकसंख्या असलेल्या बूथ) मतदारांच्या संख्येत अनपेक्षित वाढ झाल्याचे भाजपाला आढळून आले आहे.

(हेही वाचा Kanwar Yatra : जर मुसलमानांचा हलालसाठी आग्रह; तर कावड यात्रेकरूंचा हिंदू विक्रेत्यांचा आग्रह चुकीचा कसा?)

मुस्लिमबहुल (Muslim) भागातील मतदारांच्या संख्येत ही अनपेक्षित वाढ 20% ते 123% पर्यंत झाल्याचे भाजपाच्या अहवालातून समोर आले आहे. या 10 विधानसभांच्या एकूण 1467 बूथमध्ये ही वाढ झाली आहे. भाजपाने म्हटले आहे की, साधारणपणे पाच वर्षांत 15% ते 17% वाढ होते, त्यामुळे ही वाढ असामान्य आहे. भाजपाने असेही म्हटले आहे की, हिंदू लोकसंख्या असलेल्या बूथवरील मतदारांची संख्या केवळ 8% ते 10% इतकी वाढली आहे. अनेक बुथवर हिंदू मतदार कमी झाल्याचेही भाजपाने म्हटले आहे.

लोकसंख्या बदलण्याचे षडयंत्र 

या बूथचीही चौकशी केल्यास लोकसंख्या बदलण्याचे षडयंत्र समोर येईल, असे भाजपाच्या अहवालात म्हटले आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मतदार यादीत विदेशी घुसखोरांची नावे नोंदवली आहेत, त्यासाठी बेकायदेशीरपणे कागदपत्रे तयार केली आहेत, असा आरोप भाजपाने केला आहे. या मतदार यादीत बनावट आढळून आलेल्या मतदारांवर लोकप्रतिनिधी कायद्यान्वये कारवाई करावी, अशी मागणी भाजपाने केली आहे. (Muslim)

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.