१० बार मालकांनी अनिल देशमुखांना दिले ४ कोटी?

मुंबईतील बार मालकांकडून अनिल देशमुख यांना रोख रक्कम देण्यात आल्याचे पुरावे ईडीच्या हाती लागले आहेत आणि याच आधारावर ईडीने छापे टाकले.

74

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मुंबई आणि नागपुरातील निवासस्थानी सक्तवसुली संचलनालयानं (ईडी) छापे टाकले आहेत. ईडीच्या या छापेमारीमागचे एक मोठे कारण आता समोर आले आहे. मुंबईतील १० बार मालकांनी सलग तीन महिने अनिल देशमुख यांना ४ कोटी रुपये दिले होते, अशी माहिती ईडीला मिळाली आहे. याच संदर्भात अनिल देशमुखांच्या निवासस्थानांवर ईडीनं धाड टाकल्याची माहिती समोर आली आहे.

ईडीच्या हाती पुरावे लागले?

ईडीकडून शुक्रवारी, २५ जून रोजी सकाळपासून चार विविध ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या आहेत. यात अनिल देशमुख यांच्या मुंबई आणि नागपुरातील निवासस्थानांचाही समावेश आहे. आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी अनिल देशमुख यांच्याविरोधात गुन्हा दाखल आहे. ईडीकडून अनिल देशमुख यांच्या निवासस्थानासोबतच त्यांचे स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे आणि खासगी सचिव संजीव पालांडे यांच्या घरावरही छापा टाकला आहे. मुंबईतील बार मालकांकडून अनिल देशमुख यांना रोख रक्कम देण्यात आल्याचे पुरावे ईडीच्या हाती लागले आहेत आणि याच आधारावर ईडीने छापे टाकले आहेत.

(हेही वाचा : सात तासांच्या चौकशीनंतर अनिल देशमुखांची सुटका! )

ईडीच्या तपासाने देशमुख अडचणीत!

आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी मुंबईतील १० बार मालकांचे जबाब ईडीने नोंदवले आहेत. पोलिस अधिकाऱ्यांना १०० कोटींच्या वसुलीचे टार्गेट दिल्याच्या आरोपांप्रकरणी अनिल देशमुख यांची सीबीआय चौकशी सुरू आहे. यात पैशांच्या व्यवहारातील धागेदोरे शोधण्यासाठी ईडीनेही या प्रकरणात उडी घेतली आहे. यातूनच ईडीच्या हाती काही धागेदोरे लागले आहेत. मुंबई पोलिस सेवेतून निलंबीत करण्यात आलेल्या सचिन वाझेने मुंबईतील बार मालकांकडून दरमहा ४० ते ५० लाख रुपये वसुल केल्याचा आरोप आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.