राज्याच्या विधान परिषदेतून (MLC) शुक्रवार, १ मार्च रोजी दहा आमदार निवृत्त होणार आहेत. विधिमंडळाच्या अंतरिम अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी त्यांना निरोप दिला जाणार आहे. यामध्ये भाजपचे ४, शिवसेना १, ठाकरे गट २, राष्ट्रवादी काँग्रेसचा १, लोकभारती १ आणि एक अपक्ष आमदाराचा समावेश आहे.
कोण आहेत ‘ते’आमदार?
विधान परिषदेत (MLC) मुदत संपणाऱ्या आमदारांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिकेत तटकरे, शिवसेनेचे बाजोरिया, भाजपचे सुरेश धस, प्रवीण पोटे-पाटील, रामदास आंबटकर व ठाकरे गटाचे नरेंद्र दराडे, ठाकरे गटाचे विलास पोतनीस, भाजपचे निरंजन डावखरे, अपक्ष किशोर दराडे, लोकभारतीचे कपिल पाटील यांचा समावेश आहे.
Join Our WhatsApp Community