कोरोनाचा मंत्र्यांना विळखा! मागील आठवडाभरात किती मंत्र्यांना झाली लागण?

महाराष्ट्रात कोरोनाचा कहर सातत्याने वाढत आहे. कोरोनाच्या दोन लाटांच्यावेळी महाराष्ट्रात कोरोनाबाधीत रुग्ण सर्वाधिक होते. आता तिसरी लाट उंबरठ्यावर असताना, सर्वाधिक कोरोनाबाधित महाराष्ट्रातच आढळत आहेत. आता सर्वसामान्यांव्यतिरिक्त सरकारचे मंत्रीही कोरोनाच्या विळख्यात येताना दिसत आहेत. राज्यातील 10 मंत्री कोरोना पॉझिटिव्ह झाल्याची माहिती महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. अजित पवार यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, मंत्र्यांव्यतिरिक्त राज्यातील २० हून अधिक आमदारही कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. राज्यात कोरोनाची प्रकरणे अशीच वाढत राहिल्यास राज्य सरकार आणखी निर्बंध लादू शकते, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.

या मंत्र्यांना झाली कोरोनाची लागण 

  • महसूल मंत्री बाळासाहेब थोरात
  • महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर
  • शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड
  • ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे
  • आदिवासी विकास मंत्री के.सी. पाडवी

( हेही वाचा :वैष्णोदेवी चेंगराचेंगरी : ‘ही’ आहेत मृत आणि जखमी भाविकांची नावे )

आमदार 

  • भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील
  • भाजप आमदार सागर मेघे

राज्य विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन नुकतेच झाले. या हिवाळी अधिवेशनात सहभागी झालेल्या अनेक मंत्री आणि आमदारांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे. विधीमंडळात कार्यरत असलेल्या अनेक कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. तसेच विधान भवन परिसरात बंदोबस्तासाठी असलेल्या काही पोलिसांनाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.

कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत

शुक्रवारी महाराष्ट्रात कोरोनाचे ८ हजार ६७ नवीन रुग्ण आढळले. गुरुवारी राज्यात कोरोनाचे ५ हजार ३६८ रुग्ण आढळले होते, शुक्रवारी मिळालेल्या कोरोनाबाधितांची संख्या गुरुवारच्या बाधितांपेक्षा ५० टक्क्यांनी जास्त आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here