मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिंदे गटाने केलेल्या उठावामुळे शिवसेनेतून पदाधिका-यांची गळती काही कमी होताना दिसत नाही. राज्यभरातून शिवसेनेचे पदाधिकारी शिंदे गटात सहभागी होत असताना आता शिंदे गटाने भाजपला देखील मोठा धक्का दिला आहे. मुंबईत भाजपच्या 100 हून अधिक महिला पदाधिका-यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे आता भाजपची मोठी अडचण झाल्याचे आता बोलले जात आहे.
100 पदाधिका-यांचा प्रवेश
शिंदे गटात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबतच राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी देखील प्रवेश करत आहेत. पण ज्या भाजपच्या पाठिंब्याने शिंदे गटाला मुख्यमंत्रीपद मिळाले त्या भाजपमधील पदाधिका-यांनी देखील आता शिंदे गटात जाण्यास सुरुवात केली असल्याचे बोलले जात आहे. दहिसरमधील भाजपच्या 100 महिला पदाधिका-यांनी शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला आहे.
(हेही वाचाः महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचा स्वबळाचा नारा, बैठकीत निर्णय)
सुर्वेंच्या मतदारसंघात पक्षप्रवेश
मुंबई महापालिका निवडणुकांसाठी आता शिंदे गट आणि भाजपने कंबर कसली आहे. हे दोन्ही पक्ष निवडणूक एकत्र लढवणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे हे दोन्ही पक्ष मुंबईत आपली ताकद वाढवत आहेत. सुर्वे यांच्या मतदारसंघातील मुंबई वॉर्ड क्रमांक 25 मध्ये हा पक्षप्रवेश झाला आहे. यामध्ये भाजपच्या माजी वॉर्ड अध्यक्षांचा देखील समावेश आहे.
राष्ट्रवादीलाही धक्का
अलिकडेच नवी मुंबईत शिंदे गटाने राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का देत राष्ट्रवादीच्या 2 माजी नगरसेवकांसह 6 तालुकाध्यक्षांनी शिंदे गटात प्रवेश केलाय त्यामुळे राष्ट्रवादीपाठोपाठ शिंदे गटाने आपला मित्र पक्ष असलेल्या भाजपला देखील धक्का द्यायला सुरुवात केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
Join Our WhatsApp Community