वन्य प्राणी रुग्णालय आणि पुनर्वसन केंद्रासाठी १०० कोटींचा निधी देणार, Shrikant Shinde यांची माहिती

126
वन्य प्राणी रुग्णालय आणि पुनर्वसन केंद्रासाठी १०० कोटींचा निधी देणार, Shrikant Shinde यांची माहिती
वन्य प्राणी रुग्णालय आणि पुनर्वसन केंद्रासाठी १०० कोटींचा निधी देणार, Shrikant Shinde यांची माहिती
डायघर येथे महाराष्ट्र शासनाच्या वन विभागातर्फे नव्याने सुरु करण्यात आलेल्या वन्यप्राणी रूग्णालय तथा पुनर्वसन केंद्राचे कल्याण लोकसभा (Kalyan Lok Sabha) मतदारसंघाचे खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे (Shrikant Shinde) यांच्या हस्ते याचे लोकार्पण करण्यात आले.  यामुळे उपचारानंतर पूर्णपणे बरे होण्यासाठी प्राण्यांना एक सुरक्षित निवारा देखील उपलब्ध झाला आहे. तर या ठिकाणी देशातील उत्तम दर्जाचे असे स्टेट ऑफ आर्ट असलेले प्राणिसंग्रहालय, बचाव आणि पुनर्वसन केंद्राची उभारणी करण्यात यावी. यासाठी सविस्तर प्रकल्प आराखडा तयार करून तो लवकरात लवकर सादर करावा. यासाठी गरज पडल्यास १०० कोटी रुपयांच्या भरीव निधीची तरतुद केंद्र, राज्य सरकार तसेच जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून तातडीने करण्यात येईल. असे आश्वासन खासदार डॉ.श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना दिले.
(हेही वाचा- Raj Thackeray : विधानसभेसाठी मनसेकडून दोन उमदेवार जाहीर)

कल्याण येथील डायघर येथे महाराष्ट्र शासनाच्या वन विभागातर्फे वन्यप्राणी रूग्णालय तथा पुनर्वसन केंद्र उभारण्यात आले आहे. या केंद्रात वन्यप्राण्यांवर उपचार करण्यासाठी सर्व आवश्यक सोयीसुविधा उभारण्यात आले आहे. तसेच जखमी प्राण्यांच्या शस्त्रक्रियेसाठी देखील सुविधा या ठिकाणी उभारण्यात आल्या आहेत. वाहनांच्या धडकेत, नैसर्गिक आपत्तीमुळे, विजेचा झटका लागून तसेच काही संरक्षित वन क्षेत्रात घुसखोरी करून वन्य प्राण्यांना तसेच पक्षांना इजा करणाऱ्या काही समाज कंटकांमुळे वन्य जीव अनेकदा जखमी होत असल्याचे निदर्शनास येत असते. या प्राण्यांना तातडीने उपचार न मिळाल्यास त्यांचा मृत्यू देखील होतो तर काही वन्य प्राण्यांना कायमचे अपंगत्व येते. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या वन विभागातर्फे वन्यप्राणी रूग्णालय तथा पुनर्वसन केंद्र उभारण्यात आले आहे. या केंद्रामुळे केवळ कल्याण, डोंबिवली येथीलच नव्हे तर संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील वन्य प्राण्यांवर उपचार करणे सुकर होणार आहे. तसेच या ठिकाणी उपचारानंतर प्राण्यांना सुरक्षित पद्धतीने ठेवण्यासाठी पिंजऱ्यांची देखील उभारणी करण्यात आली आहे. यामुळे उपचारानंतर पूर्णपणे बरे होण्यासाठी प्राण्यांना एक सुरक्षित निवारा देखील उपलब्ध झाला आहे. तर शहरात आढळून येणाऱ्या बिबट्याना जेरबंद करून त्यांना सुरक्षित मिळेपर्यंत काही काळ या केंद्रात ठेवण्यासाठी विशेष पिंजरे देखील या केंद्रात उभारण्यात आले आहे. तसेच शस्त्रक्रियेसाठी आणि उपचारांसाठी आधुनिक यंत्रसामग्री, प्रशिक्षित वैद्यकीय कमर्चारी डॉक्टर यांची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आली आहे. यामुळे उपचारानंतर पूर्णपणे बरे होण्यासाठी प्राण्यांना एक सुरक्षित निवारा देखील उपलब्ध झाला आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे (Shrikant Shinde) यांच्या हस्ते याचे शनिवारी लोकार्पण करण्यात आले. या केंद्राच्या लोकार्पणानंतर सर्व प्राणीप्रेमी कडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

(हेही वाचा- सरकारविरुद्ध एकत्र या; Waqf Act Amendment ला विरोध करण्यासाठी मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचा थयथयाट)

या प्रसंगी प्रसंगी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी सर्वांशी संवाद साधत असताना, या ठिकाणी हे रुग्णालय सुरू झाले ही अतिशय उत्तम बाब आहे. मात्र या ठिकाणी राज्यातीलच नव्हे तर देशातील उत्तम दर्जाचे असे स्टेट ऑफ आर्ट असलेले प्राणिसंग्रहालय, बचाव आणि पुनर्वसन केंद्राची उभारणी करण्यात यावी, अशा सूचना वनविभागासह इतर संबंधित विभागांना दिल्या. परेल येथील शासकीय वन्यप्राणी रुग्णालयाच्या धर्तीवर रुग्णालयाची उभारणी करण्यात यावी. तर भायखळा येथे असलेल्या प्राणिसंग्रहालयाच्या धर्तीवर बचाव आणि पुनर्वसन केंद्राची उभारणी करण्यात यावी. यासाठी सविस्तर प्रकल्प आराखडा तयार करून तो लवकरात लवकर सादर करावा. यासाठी गरज पडल्यास १०० कोटी रुपयांच्या भरीव निधीची तरतुद केंद्र, राज्य सरकार तसेच जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून तातडीने करण्यात येईल. यामुळे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि मुंबईतील इतर केंद्रांवर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही, असे यावेळी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी सांगितले.

हेही पहा- 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.