विधानसभा निवडणुक (Assembly Election 2024) मतदानाच्या एक दिवस अगोदर नालासोपाऱ्यात पैसे वाटल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे (BJP) राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यावर करण्यात आला होता. तर, काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांसह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला होता. आता, विनोद तावडे (Vinod Tawde) यांनी याप्रकरणी काँग्रेस नेत्यांना नोटीस बजावली आहे. माफी मागा, अन्यथा १०० कोटी रुपयांचा दावा ठोकणार असल्याचं तावडे यांनी नोटीसमध्ये म्हटलं आहे. तसेच या नोटीसमध्ये तावडे यांनी राहुल गांधी (Rahul Gandhi), सुप्रिया श्रीनेट आणि मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) यांचा उल्लेख केला आहे.
(हेही वाचा – Assembly Election : विधानसभेत चालला नाही मुस्लिमांचा फतवा; ‘एक है तो सेफ है’ ने वाढला हिंदूंच्या मतांचा टक्का)
‘२४ तासांत माफी मागावी’
विनोद तावडे (Vinod Tawde Notice) म्हणाले की, पैसे वाटपाबाबत तिघांनीही आपल्यावर खोटे व निराधार आरोप केले आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या तिन्ही नेत्यांनी २४ तासांच्या आत बिनशर्त माफी मागावी, अशी मागणी एक्सच्या माध्यमातून केली आहे. कायदेशीर नोटीसमध्ये विनोद तावडे म्हणाले की, काँग्रेस नेत्यांनी माफी न मागितल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल आणि १०० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याबद्दल दिवाणी कारवाईही केली जाईल.
(हेही वाचा – Rahul Gandhi यांच्यावर डॉक्टर्स का आहेत नाराज?)
कांग्रेस का एक ही काम है झूठ फैलाना!
नालासोपारा वाले झूठे मामले में मैंने कांग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खड़गे, राहुल गाँधी और पार्टी प्रवक्ता सुप्रिया श्रीनेत को मानहानि का नोटिस भेजा है, क्योंकि उन्होंने इस मामले में झूठ फैलाकर मेरी और भारतीय जनता पार्टी की छवि को नुकसान… pic.twitter.com/ZO75yKSx8m
— Vinod Tawde (@TawdeVinod) November 22, 2024
काय आहे संपूर्ण प्रकरण?
महाराष्ट्रात मतदानाच्या एक दिवस आधी बहुजन विकास आघाडीचे प्रमुख हितेंद्र ठाकूर (Hitendra Thakur) यांनी भाजपाचे सरचिटणीस विनोद तावडे यांच्यावर नालासोपाऱ्यातील निवांता हॉटेल्समध्ये पैसे वाटल्याचा आरोप केला होता. घटनेच्या वेळी विनोद तावडे मुंबईपासून ६० किलोमीटर अंतरावर असलेल्या विरारमधील एका हॉटेलमध्ये उपस्थित होते. यावेळी बहुजन विकास आघाडीच्या शेकडो कामगारांनी घटनास्थळी पोहोचून गोंधळ घातला.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community