मुंबै बँकेची बदनामी करणाऱ्यांविरोधात १ हजार कोटींचा दावा!

आमची राजकीय बदनामी करा, वैयक्तिक बदनामी करा परंतु एका आर्थिक संस्थेची बदनामी झाल्याचा परिणाम त्यांचे ग्राहक, डिपॉझिटर्स यांच्यावर होतो. या बँकेवर हजारो लोकांचे पोट अवलंबून असते, असे प्रवीण दरेकर म्हणाले.

मुंबै जिल्हा मध्यवर्ती बॅंक ही राज्यातील प्रगत आणि उत्तम बॅंक आहे. कारण मुंबै बॅंक आम्ही बाराशे कोटीच्या टप्प्यावरून दहा हजार कोटीवर मेहनतीने आणली. मुंबईच्या सहकाराचे हे वैभव आहे. या लौकिकास काळीमा फासण्याचे काम दुदैर्वाने काही जणांकडून झाले आहे. त्यामुळे बॅंकेच्या संदर्भात कोणीही उठसूट वाटेल ते स्टेटमेंट देईल हे अयोग्य असल्यामुळे बँकेने मुंबई उच्च न्यायालयात १ हजार कोटीचा दावा दाखल केल्याची माहिती विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते व मुंबै जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष प्रविण दरेकर यांनी दिली.

मुंबै जिल्हा बँक मुंबईच्या सहकाराचे वैभव

प्रसिध्दीमाध्यमांशी बोलताना दरेकर यांनी सांगितले की, मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेला इथपर्यंत आणण्यात अनेक माजी अध्यक्ष, संचालक आदीचे योगदान आहे. मुंबईच्या सहकाराचे हे वैभव आहे. पण बॅंकेला काळिमा फासण्याचे काम सर्व टप्प्यावर होत आहे. आमची राजकीय बदनामी करा, वैयक्तिक बदनामी करा परंतु एका आर्थिक संस्थेची बदनामी झाल्याचा परिणाम त्यांचे ग्राहक, डिपॉझिटर्स यांच्यावर होतो. या बँकेवर हजारो लोकांचे पोट अवलंबून असते. एखाद्या बातमीने किंवा एखाद्या स्टेटमेंटने बँक अडचणीत आली तर त्याची जबाबदारी कोण घेणार? म्हणून आम्ही मुंबई बँकेच्या बदनामी करणाऱ्यांच्या विरोधात उच्च न्यायालयात सूट नंबर २१९०९ आणि सूट नंबर २१९३५ या नोंदणी क्रमांकप्रमाणे दावा दाखल केला आहे. बॅंकेची नाहक बदनामी करणा-यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी आम्ही न्यायालयात केल्याची माहिती दरेकर यांनी यावेळी दिली. आम्ही सव्वा रुपया वगैरेचा नाही तर १ हजार कोटीचा दावा दाखल केल्याचा मार्मिक टोलाही दरेकर यांनी यावेळी लगावला.

(हेही वाचा : काँग्रेसवाले मेले होते, उद्धव ठाकरेंमुळे जिवंत झाले! सेना समर्थक आमदारामुळे आघाडीत बिघाडी)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here