तिरुपती मंदिराच्या (Tirupati Temple) ट्रस्टने नुकतेच १८ कर्मचाऱ्यांना काढून टाकले आहे. कारण ते बिगर हिंदू असल्याचे म्हटले आहे. त्यानंतर आता भाजपाने मंदिरात तब्बल १ हजार कर्मचारी बिगर हिंदू असल्याचा दावा केला आहे. त्यांना काढून टाकण्याची मागणी केली आहे.
आंध्र प्रदेश भाजपाचे प्रवक्ते आणि टीटीडी सदस्य भानू प्रकाश रेड्डी म्हणाले की, मंदिराच्या ट्रस्टचे (Tirupati Temple) प्रतिनिधी १४ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांची भेट घेणार आहेत. त्यावेळी ते या १ हजार कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची मागणी करणार आहेत. ट्रस्टने (Tirupati Temple) त्या बिगर हिंदू 18 कर्मचाऱ्यांसमोर दोन अटी ठेवल्या आहेत, एकतर त्यांनी दुसऱ्या सरकारी विभागात बदली घ्यावी किंवा व्हीआरएस (स्वेच्छा निवृत्ती) घ्यावी. मंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी हे केले जात आहे.
(हेही वाचा अनधिकृत दर्ग्यात उरुस करण्याच्या वक्फ बोर्डाच्या परवानगीला High Court ने दिली स्थगिती)
टीटीडीने निवेदनात म्हटले आहे की, टीटीडीचे अध्यक्ष बीआर नायडू यांच्या सूचनेनुसार ही कारवाई करण्यात आली. संस्थेत काम करताना बिगर हिंदू धार्मिक प्रथा पाळणाऱ्या 18 कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. टीटीडीमध्ये काम करूनही ते सर्वजण बिगर-हिंदू धार्मिक परंपरांचे पालन करत आहेत. आता त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
‘ते’ १८ कर्मचारी कोणत्या विभागातील?
- टीटीडी एज्युकेशनल इन्स्टीट्यूटचे सहा शिक्षक
- डेप्युटी एक्झीक्युटिव्ह ऑफिसर, वेलफेअर डिपार्टमेंट
- असिस्टंट टेक्निकल ऑफिसर, इलेक्ट्रॉनिक डिपार्टमेंट
- हॉस्टेल वर्कर
- 4 अन्य कर्मचारी
Join Our WhatsApp Community