Mumbai Police : मुंबई पोलीस दलात शिपाई संवर्गाची १० हजार पदे रिक्त

172
Assembly Election च्या पार्श्वभूमीवर मुंबईतील १११ पोलीस निरीक्षकांच्या जिल्ह्याबाहेर बदल्या

मुंबई पोलीस दलात पोलीस शिपाई संवर्गाची सुमारे १० हजार पदे रिक्त असल्याची माहिती उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधिमंडळात दिली.

दरवर्षी सुमारे १५०० पोलीस निवृत्त होतात. सन २०१९, २०२० व २०२९ मध्ये पोलीस भरती झालेली नाही. दरवर्षी नियत वयोमानानुसार होणारी सेवानिवृत्ती. आंतर जिल्हाबदली आदी कारणांमुळे रिक्त पदांची संख्या वाढली आहे. शिवाय सुमारे ५०० पोलिसांचा कोविडमुळे मृत्यु झालेला आहे, असेही फडणवीस म्हणाले.

मुंबई पोलीस आयुक्तालयातील मोठया प्रमाणावरील रिक्त पदांचा विचार करुन शासनाने संपूर्ण राज्यातील रिक्त असलेल्या पदांपैकी १४,९५६ पोलीस शिपाई संवर्गातील पदे व २,१७४ पोलीस शिपाई चालक संवर्गातील पदे तसेच एस. आर. पी. एफ (SRPF) ची पदे भरण्यास मंजूरी दिलेली असून एकूण १८,३३९ पदांची पोलीस भरती प्रक्रिया सुरू असल्याची माहिती फडणवीस यांनी सभागृहात दिली.

(हेही वाचा – IND vs PAK : नियोजित दिवसाच्या एक दिवस आधीच होणार सामना?)

कंत्राटी पदे भरणार का?

  • भरण्यात येणाऱ्या पदांमध्ये बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयासाठी ७,०७६ पोलीस शिपाई संवर्गातील पदे व पोलीस चालक संवर्गातील ९९४ पदे भरण्यात येणार आहेत. मुंबई पोलीस आयुक्तालयासाठी वर नमूद ७,०७६ पदे भरल्यानंतर सुध्दा काही पदे रिक्त राहणार आहेत.
  • मुंबई पोलीस आयुक्तालयासाठी ७,०७६ पोलीस शिपाई पदे नियमित भरतीव्दारे भरण्याची कार्यवाही करण्यात येत असून, भरती प्रक्रिया आणि प्रशिक्षण पूर्ण होऊन प्रत्यक्ष कर्तव्यासाठी पोलीस शिपाई उपलब्ध होण्याकरिता आणखी किमान दीड ते दोन वर्षांचा कालावधी लागणार आहे.
  • या सर्व कारणांमुळे मुंबई पोलीस आयुक्तालयाने दिनांक १७.०४.२०२३ च्या पत्रान्वये ३००० मनुष्यबळ तुर्तास महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून उपलब्ध करुन देण्याची विनंती केली आहे.
  • पोलीस आयुक्त मुंबई यांच्या विनंतीनुसार शासनाच्या दि. २४.०७.२०२३ च्या शासन निर्णय अन्वये महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडूनच ३००० मनुष्यबळ प्रत्यक्ष पदभरतीचा कालावधी किंवा ११ महिने यापैकी जो कमी असेल त्याच कालावधीसाठी उपलब्ध करुन घेण्यास मान्यता देण्यात आली आहे.
  • या ३००० कर्मचाऱ्यांकडून केवळ सुरक्षा विषयक कामकाज व गार्ड विषयक कर्तव्य, स्टॅटिक डयुटी करुन घेण्यात येणार असून कायदे विषयक अंमलबजावणी व तपासाचे कुठलेही काम देण्यात येणार नाही.
  • दिनांक २४.०७.२०२३ शासन निर्णयान्वये मुंबई पोलीस च्या आयुक्तालयाकरिता देण्यात आलेले बाह्ययंत्रणे वरील ३००० मनुष्यबळ हे निव्वळ तात्पुरत्या स्वरुपातील असून, बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयातील नियमित पोलीस शिपाई पदे कर्तव्यावर उपलब्ध झाल्यानंतर या बाह्ययंत्रणे वरील मनुष्यबळाच्या सेवा संपुष्टात येतील.
  • राज्य सरकारचेच महामंडळ असलेल्या महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळातर्फे उपलब्ध करुन देण्यात आलेल्या जवानांमार्फत विविध केंद्र व राज्य शासकीय कार्यालये, व्यावसायिक प्रतिष्ठाने, सार्वजनिक ठिकाणे इ. करिता यापुर्वीही सुरक्षा नियमितपणे वापरली गेली आहे व वापरली जात आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.