आमच्याकडे तिसरी घंटा वाजली की, आम्ही आमची पोझिशन घेते. चांगल्या तालमी केल्या त्यांना लोकं आशीर्वाद देतात, नाहीतर घरी जावं लागतं. 2019 ला प्रयोग झाला, तर कट्यार पाठीत घुसली. आता आम्ही 2021 ला प्रयोग केला. ‘आता होती गेली कुठे’, असे म्हणत नाव न घेता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला.
१०० व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनात (100th Akhil Bhartiya Marathi Natya Sammelan) ते उपस्थित होते. यावेळी त्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लक्ष्य करून तुफान फटकेबाजी केली. ते पुढे म्हणाले की, मुख्यमंत्र्यांच्या मानेला पट्टा दिसला की, ‘सिंहासन’ सिनेमा आठवतो, पण आताच्या मुख्यमंत्र्यांना पट्ट्याची गरज पडली नाही, असं म्हणत फडणवीसांनी ठाकरेंवर टीका केली.
(हेही वाचा – Raj Thackeray : राज ठाकरे स्वतः टोलनाक्यावर खालापूर टोलनाक्यावर उतरले अन् …)
नाट्य कलावंतांसाठी योगदान देत राहू…
पुढे बोलताना ते म्हणाले की, असे प्रयोग सुरूच असतात. कला, नाट्य या गोष्टी समृद्ध वारसा सांगतात. त्यासाठी भौतिक नाही, तर मानसिकदृष्ट्या समृद्ध करतात. नागरिकांनी आम्हाला अधिकार दिले आहेत. नाट्य कलावंतांनी आम्हाला जे काही सांगितले आहे. त्यासाठी आम्ही योगदान देत राहू, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
‘हा’ विचार कलावंतच करू शकतात…
या अमृतकाळात आपले क्षेत्र कुठे असेल. नाटक, संस्कृती हे क्षेत्र कुठे असेल, पण नाटक हे क्षेत्र २०३५मध्ये कुठे असेल, याचा विचार आम्ही राजकारणी करू शकत नाही. हा दृष्टिकोण आणि त्याचा विचार कलावंत करू शकतात, असे फडणवीस म्हणाले.
हेही पहा –