Veer Savarkar : आद्य हिंदी राष्ट्रध्वज स्टूटगार्टमध्ये फडकावलेल्या घटनेला झाली ११५ वर्षे; सावरकर स्मारकात जागवल्या स्मृती

322

भारतातील जनमानसामध्ये स्वातंत्र्याची आस जगवण्यासाठी कारणीभूत ठरला आद्य हिंदी राष्ट्रध्वज. ८ ऑगस्ट १९०७ रोजी बर्लिन शहरी (स्टूटगार्ट) येथे भरलेल्या आंतरराष्ट्रीय समाज सत्तावादी मंडळींच्या संमेलनात मादाम कामा यांनी पहिल्यांदा हा राष्ट्रध्वज फडकवला होता. मंगळवारी या घटनेला ११५ वर्षे पूर्ण झाली. यानिमित्ताने स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक येथे स्मारकामध्ये राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमातील विद्यार्थ्यांना स्मारकाचे कार्यवाह राजेंद्र वराडकर आणि स्मारकाचे सदस्य प्रा. महेश कुलकर्णी यांनी या आद्य हिंदी राष्ट्रध्वजाचे महत्व सांगितले.

यावेळी मुलांनी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकातील वीर सावरकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे दर्शन घेतले, त्यानंतर राजेंद्र वराडकर यांनी या मुलांना आद्य हिंदी राष्ट्रध्वजामागील इतिहास सांगितला. तसेच स्मारकातील बॉक्सिंगचे प्रशिक्षक राजन जोथाडी यांनीही याविषयी माहिती दिली.

वीर सावरकरांनी केलेले राष्ट्रध्वजाचे वर्णन 

२६ ऑक्टोबर १९३७ रोजी पुणे येथील टिळक स्मारक मंदिरामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या हस्ते या राष्ट्रध्वजाचे अनावरण करण्यात आले होते. त्यावेळी वीर सावरकर यांनी भाषण केले होते. तेव्हा वीर सावरकर यांनी या ध्वजाचे अतिशय सुंदर शब्दांत वर्णन करताना म्हटले होते की, १९०७च्या सुमारास आम्ही इंग्लंडमध्ये असलेले क्रांतिकारक तरुण लंडनमधील ‘इंडिया हाउस मध्ये रात्रीच्या वेळी एकत्र जमत असू. तेथे एका भावी स्वराज्याचे निशाण कसे असावे यावरही आमची चर्चा होत असे. तेव्हा आम्ही या राष्ट्रध्वजाचा आराखडा आखला तो असाच होता. अमेरिकेतील संयुक्त संस्थाने ताऱ्यांच्या रूपाने अमेरिकेच्या निशाणावर असतात. तेव्हा त्याप्रमाणे अखंड हिंदुस्थान तयार करणारे हिंदुस्थानातील त्यावेळच्या परिस्थितीप्रमाणे भाषावार असे आठ प्रांत कल्पिले होते त्या आठ प्रांतांची ही आठ कमळे निदर्शक आहेत. अमेरिकन ताऱ्यांऐवजी कमलपुष्प हे हिंदुस्थानचे वैशिष्ट्यनिदर्शक असल्यामुळे त्याची योजना आम्ही केली. ज्याकरितां शेकडो तरुणांनी आपली डोकी फोडून घेतली व फांसावर लटकतांनाही ज्याचा नामोच्चार केला तो ‘वंदेमातरम्’ हा राष्ट्रमंत्र म्हणून आम्ही या ध्वजावर योजला आणि ‘यावच्चंद्रदिवाकरौ’ आमचा हिंदुस्थान स्वतंत्र राहील हे दर्शविणारी ही सूर्य व चंद्र यांची चिन्हे आहेत. यांतील हिरवा रंग राष्ट्राच्या तारुण्याच्या जीवनाचे निदर्शक आहे. केशरी रंग यश दर्शवितो. पण हे तारुण्य व यश ज्यावर अधिष्ठित करावयाचे तो रक्तरंग सर्वाच्या खाली योजला की असून तो बलसामर्थ्य यांचा निदर्शक आहे.

(हेही वाचा PM Narendra Modi : अविश्वास प्रस्तावावर बोलण्यासाठी मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करा; मोदींचा खासदारांना कानमंत्र)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.